महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'या' वक्तव्यासाठी राहुल गांधींना निवडणूक आयोगाची नोटीस - congress president

राहुल यांनी ४८ तासांत कोणताही प्रतिसाद न दिल्यास त्यांच्यावर कोणत्याही पूर्वकल्पनेशिवाय आचारसंहिता भंगाची कारवाई केली जाईल, असे आयोगाने म्हटले आहे.

राहुल गांधी

By

Published : May 2, 2019, 10:27 AM IST

नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी २३ एप्रिलला मध्य प्रदेशात शहडोल येथे केलेल्या एका भाषणाबद्दल निवडणूक आयोगाने त्यांच्यावर कारणे दाखवा नोटीस बजावली. 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'आदीवासींना गोळ्या घालण्याचा कायदा' बनवला आहे,' असे वक्तव्य राहुल यांनी केले होते. आयोगाने त्यांना या वक्तव्याचे ४८ तासांत स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे.


शहडोलमधील सभेत बोलताना राहुल गांधी यांनी ‘मोदी सरकारने आदिवासींसाठी नवा कायदा बनवला आहे. त्याअंतर्गत आदिवासींना गोळ्या घातल्या जातील, असे म्हटले होते. 'ते तुमची जमीन, जंगल, जल हिरावून घेऊ शकतील. तुमची एन्काऊंटर केली जातील. गोळ्या घातल्या जातील’ अशी विधाने केली होती. त्याबद्दल त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे.

राहुल यांनी ४८ तासांत कोणताही प्रतिसाद न दिल्यास त्यांच्यावर कोणत्याही पूर्वकल्पनेशिवाय आचारसंहिता भंगाची कारवाई केली जाईल, असे आयोगाने म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details