नवी दिल्ली - निवडणूक आयोगाने राजकिय पक्षांना सैन्यातील कोणत्याही व्यक्तीचे छायाचित्र प्रचारामध्ये न वापरण्याच्या सक्त सूचना दिल्या आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने याबाबतचे पत्रक प्रसिध्द केले आहे.
प्रचारासाठी जवानांचे छायाचित्र न वापरण्याची निवडणूक आयोगाची सक्ती - सक्ती
सैन्यातील व्यक्तीचे छायाचित्र निवडणूकीच्या प्रचारात न वापरण्याची सूचना देण्याची विनंती संरक्षण दलाने निवडणूक आयोगाकडे केली होती. यानंतर निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला.
संरक्षण दलाकडे देशाच्या संरक्षणाची महत्त्वाची भूमिका असते. त्यांचा राजकारण आणि निवडणुका यांच्याशी संबंध नसतो. त्यामुळे संरक्षण दलांकडून करण्यात आलेल्या कारवाईचा वापर निवडणूक प्रचारादरम्यान करण्यात येऊ नये, असेही निवडणूक आयेगाने सांगितले आहे.
काही दिवसापूर्वी नवी दिल्ली येथे भाजपच्या एका बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमीत शहा यांच्यासोबत विंग कमांडर अभिनंदन यांचे छायाचित्र वापरण्यात आले होते. मोदी है तो मुमकिन है...नमो अगेन २०१९ असे लिहिण्यात आले होते.