महाराष्ट्र

maharashtra

By

Published : May 7, 2019, 12:09 PM IST

ETV Bharat / bharat

पंतप्रधान मोदींना आणखी २ प्रकरणांत क्लीन चिट, निवडणूक आयोगाकडून आठव्यांदा दिलासा

या निर्णयांसह मोदींना आतापर्यंत ८ प्रकरणांत क्लीन चिट मिळाली आहे. तर, अमित शाह यांना २ प्रकरणांत आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना क्लीन चिट दिली आहे.

पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली - निवडणूक आयोगाने पंतप्रधान मोदींना निवडणूक आचारसंहिता भंगाच्या आणखी २ प्रकरणात निवडणूक आयोगाने 'क्लीन चिट' दिली आहे. यासह मोदींना आठव्यांदा दिलासा मिळाला आहे. मोदींनी २३ एप्रिलला अहमदाबादमध्ये 'रोड शो' केला, असा आरोप काँग्रेसने केला होता. याशिवाय कर्नाटकातील चित्रदुर्ग येथे ९ एप्रिलला केलेल्या भाषणात बालाकोट हवाई हल्ल्याच्या नायकांना आपले मत समर्पित करावे, असे त्यांनी म्हटले होते.

अहमदाबाद येथे मोदींनी मतदानाच्या दिवशी मतदान केल्यानंतर मतदान केंद्रापासून काही अंतर जाऊन 'रोड शो' केला. त्याचबरोबर त्यांनी पत्रकारांशीही संवाद साधला बोलले. त्यांनी राजकीय टिप्पणीही केली, असे काँग्रेसने म्हटले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यामध्ये मोदींकडून आचारसंहितेचे उल्लंघन झाले नसल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. याशिवाय, महाराष्ट्रातील लातूर येथे केलेल्या भाषणाप्रमाणेच कर्नाटकातील चित्रदुर्ग येथे केलेल्या भाषणाविषयीही काँग्रेसने आक्षेप नोंदवला होता. मात्र, आधी लातूरमध्ये आणि आता चित्रदुर्गमध्ये मोदींना क्लीन चिट मिळाली आहे.

आयोगाने आतापर्यंत हे निर्णय सार्वजनिक केलेले नाहीत. मात्र, या निर्णयांसह मोदींना आतापर्यंत ८ प्रकरणांत क्लीन चिट मिळाली आहे. तर, अमित शाह यांना २ प्रकरणांत आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना क्लीन चिट दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details