लखनौ -बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांच्यावर निवडणूक आयोगाने प्रचार करण्याची बंदी आणल्यानंतर, अता पुन्हा दोन नेत्यांना आयोगाने दणका दिला आहे. यामध्ये समाजवादी पक्षाचे नेते आझम खान आणि भाजप नेत्या मेनका गांधी यांचा समावेश आहे. प्रचार सभांमध्ये आचारसंहिता भंग केल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे.
लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर नेते जमेल तशी विधाने करत आहेत. सोमवारी निवडणूक आयोगाने मयावती आणि योगी आदित्यनाथ यांना प्रचार करण्यास बंदी घातली. त्यानंतर आझम खान यांना जयप्रदा यांच्यावर आक्षेपार्ह विधान केल्यामुळे दणका दिला आहे. तर, भाजप नेत्या मेनका गांधी यांनी भर सभेत मुस्लिमांना धमकी दिल्यावरुन आयोगाने जोरदार धक्का दिला आहे.