नवी दिल्ली - जम्मू काश्मीर आणि राज्यात पालघरमध्ये भूकंपाचा धक्का बसला. जम्मूमध्ये 3.0 एवढ्या तीव्रतेची रिश्टर स्केलवर त्याची नोंद झाली. तर राज्यात पालघरमध्ये 3.1 रिश्टर स्केलचा हा भूकंप असल्याची माहिती समोर आली होती.
जम्मू काश्मीरसह राज्यात पालघरमध्ये भूकंपाचा धक्का - पालघरमध्ये भूकंपाचा धक्का
जम्मू काश्मीर आणि पालघरमध्ये भूकंपाचा धक्का बसला. जम्मूमध्ये 3.0 एवढ्या तीव्रतेची रिश्टर स्केलवर त्याची नोंद झाली. तर पालघरमध्ये 3.1 रिश्टर स्केलचा हा भूकंप असल्याची माहिती समोर आली होती.
भूकंप
जम्मू काश्मीरधील पूर्व कटारा प्रदेशात शुक्रवारी पहाटे 5.11 मिनिटांनी भूकंपाचा धक्का बसला. तर पालघरमध्ये मध्यरात्री 12:26 मिनिटांनी भूंकप झाला. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झाली नाही.
या अगोदरही पालघरमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला होता. सातत्याने भूकंपाचे धक्के बसत असल्याने पालघर जिल्ह्यातील नागरिकांमध्ये काहीसे भितीचं वातावरण पाहायला मिळत आहे. याआधीही जून महिन्यात जम्मू काश्मीरला सहा भूकंपाचे धक्के जाणवले होते.