नवी दिल्ली - भारत-पाकिस्तान सीमेवरील पाकव्याप्त काश्मीर भागात आज (गुरूवार) दुपारी १२.३० वाजता पुन्हा भूकंपाचे हादरे बसले. ४.८ क्षमतेचा भूकंपाने सीमा परिसर हादरला. मागील दोन दिवसांपासून पाकिस्तानच्या उत्तर भागामध्ये भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. यामध्ये आत्तापर्यंत ३८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती स्थानिक माध्यमांनी दिली आहे.
४.८ रिश्टर स्केल क्षमतेच्या भूकंपाने हादरली भारत - पाकिस्तान सीमा - ४.८ रिश्टर स्केल भुकंप
भारत-पाकिस्तान सीमेवरील पाकव्याप्त काश्मीर भागात आज (गुरूवार) दुपारी १२.३० वाजता पुन्हा भूकंपाचे हादरे बसले.
प्रतिकात्मक फोटो
हिमालय क्षेत्रामधील भारत पाकिस्तान सीमा भाग भूकंप्रवण क्षेत्रामध्ये येतो. पाकिस्तानातील मिरपूर, झेलम आणि आसपासच्या भागामध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. मंगळवारी झालेल्या भूकंपामध्ये ३८ जणांचा मृत्यू, तर ५३ जण जखमी झाले आहेत.
भूकंपामुळे पाकिस्तानातील रस्ते उखडले आहे. धरणे, पूल आणि इमारतींचेही नुकसान झाले आहे. आपत्ती निवारण पथकाने मदत आणि बचावकार्य हाती घेतले आहे. तसेच मृतांची संख्या वाढण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.