गांधीनगर : गुजरातच्या कच्छमधील भचाऊ गावापासून सुमारे १४ किलोमीटरवर भूंकप झाला. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.२ एवढी नोंदवण्यात आली. आज दुपारीपासूनच या भागात चार लहान लहान भूकंपांचे धक्के जाणवले होते. १.८, १.६, १.७ आणि २.१ अशा तीव्रतेचे हे धक्के होते, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
रविवारी सायंकाळी ५.११च्या सुमारास ४.२ रिश्टर स्केल एवढा भूकंपाचा धक्का बसला. याठिकाणीच १४ जूनला ५.३ रिश्टर स्केल एवढा भूकंप झाला होता. याचे धक्के सौराष्ट्रामधील काही ठिकाणीही जाणवले होते, अशी माहिती भूकंपविज्ञान संशोधन संस्थेने दिली.