मुंबई -दिल्ली आणि आसपासच्या परिसरात गुरूवारी रात्री ११ वाजून ४५ मिनिटाला भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता ४.२ रिश्टर स्केल असल्याची माहिती भूकंप विज्ञान केंद्राकडून देण्यात आली. या भूकंपाचा केंद्रबिंदू गुरुग्रापासून ४८ किलोमीटर अंतरावर होता. दरम्यान, आतापर्यंत कोणतीही जीवित अथवा वित्त हानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.
याआधी २ डिसेंबर रोजी दिल्ली आणि आसपासच्या परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले होते. याची तीव्रता २.७ रिश्टर स्केल इतकी होती. या भूकंपाचा मुख्य केंद्रबिंदू गाजियाबाद होता. सकाळी ४ वाजून ५ मिनिटाला हे धक्के जाणवले होते.
दरम्यान, या वर्षी अनेकदा दिल्ली आणि परिसरात भूकंपाचे धक्के जाणवू लागले आहेत. एप्रिल महिन्यात दिल्ली आणि आसपासच्या परिसरात १५ हून अधिक वेळा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. या दरम्यान, भूकंपाचा केंद्रबिंदू दिल्लीच्या जवळपासच्या परिसरात होता.