महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

पृथ्वी दिन प्रतिज्ञा : पुनरुत्पादक, शाश्वत आणि स्वदेशी

वैश्विक घटना एकीकडे, परंतु आपण आपल्या ग्रहाचे संवर्धन करू शकतो का? हवा आणि पाणी शुद्ध राहील आणि तरीही अर्थव्यवस्था फुलत राहील, अशी प्रतिज्ञा करता येईल? आपण जसे आत्मनिरीक्षण करू, तसे स्पष्ट होते की 'निसर्गाच्या विजयामुळे' आपण ग्रहाच्या सत्यानाशाच्या कड्यावर पोहोचलो आहोत.

earth day  earth day pledge  regenerative sustainable and swadeshi  पृथ्वी दिन प्रतिज्ञा  पुनरुत्पादक, शाश्वत आणि स्वदेशी
पृथ्वी दिन प्रतिज्ञा

By

Published : Apr 22, 2020, 10:03 AM IST

लॉकडाऊन सुरू असताना 22 एप्रिल 2020 हा दिवस नवी दिल्लीत आणि खरंतर जागतिक पातळीवरील ऐतिहासिक दिवस आहे. कारण, 1970 सालापासूनचा सर्वात स्वच्छ पृथ्वी दिन आहे. हा दिवस सुरू करणारे जॉन मॅककॉनेल यांच्या चेहऱ्यावर स्वर्गात कदाचित हसू उमटले असेल. आता अपायकारक ढग आणि बाष्पाच्या खुणा दिसत नाहीत. ऑक्सिजनच्या प्रमाणात वाढ झाल्याने देवदुतांनादेखील काहीसा हर्षवायू झाला असेल.

वैश्विक घटना एकीकडे, परंतु आपण आपल्या ग्रहाचे संवर्धन करू शकतो का? हवा आणि पाणी शुद्ध राहील आणि तरीही अर्थव्यवस्था फुलत राहील, अशी प्रतिज्ञा करता येईल? आपण जसे आत्मनिरीक्षण करू, तसे स्पष्ट होते की 'निसर्गाच्या विजयामुळे' आपण ग्रहाच्या सत्यानाशाच्या कड्यावर पोहोचलो आहोत.

अणूयुद्धापाठोपाठ पर्यावरणाचा ऱ्हास हा मानवी आयुष्याला असलेला सर्वाधिक गंभीर धोका आहे आणि याचे भौगोलिक-राजकीय परिणाम अतिशय गंभीर होऊ शकतात. जलस्त्रोतांच्या टंचाईमुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यात कदाचित अणुयुद्ध होऊ शकते, असे वक्तव्य नॉम चॉम्स्की यांनी काही दिवसांपूर्वी डेमॉक्रॉसी नॉव या कार्यक्रमात केले होते. आता आपल्या चुकांची मर्यादा संपलेली आहे आणि आपल्याला माहीत आहे की पृथ्वी यापेक्षा अधिक अत्याचार सहन करू शकणार नाही. महामारी आणि रोग हे निसर्गाचे सुधारणा करण्यासाठीचे इशारे असतात. याचा अर्थ असा की, पर्यावरणीयदृष्ट्या नाशवंत रचनेपासून दूर जाण्याची आणि नवी अर्थव्यवस्था तसेच नव्या जगाचे पुर्ननिर्माण करण्याची वेळ आली आहे.

आपण नवीन जग कसे निर्माण करू शकतो? आपण या भौतिक जगातून संन्यास घेत, आपल्या जबाबदाऱ्यांचा त्याग करून, तंत्रज्ञानविरहित आयुष्याची निवड करून वनातील संन्यासी होऊ शकतो का? नाही. जरी कोरोना विषाणू ही मृत्यूशी निगडीत आपत्ती असली. यामुळे आपल्याला गोष्टींचा बेफिकीर वापर कमी करून आणि नव्या दृष्टिकोनातून विचार करण्याची संधी मिळाली आहे, जेव्हा आपल्या शहरातील हवा पुन्हा एकदा सुदृढ आहे, पाणी स्वच्छ आहे आणि पक्षी पुन्हा गुणगुणत आहेत. हवामान बदल आणि नामशेष होण्याच्या आपत्तीपासून वाचण्यासाठी, आपल्याला आपल्या आयुष्यात आणि अर्थव्यवस्थेत पाच तत्त्वांचा अंगीकार करणे गरजेचे आहे, ती म्हणजे - वापर कमी करा (रिड्युस), पुनर्वापर (रियुझ), पुर्ननिर्माण (रिजनरेट), स्वदेशी आणि कृषिपरिस्थितीविज्ञान(अ‌ॅग्रो इकोलॉजी). भारत आणि जगाची पुन्हा उभारणी करण्यासाठी आपल्याला मजबूत हरित अर्थव्यवस्थेची(प्रदुषणरहित, वर्तुळाकार आणि नूतनीकरणक्षम आधारित तंत्रज्ञान) गरज आहे. गेल्या शतकभरात तंत्रज्ञानाचा वापर पृथ्वीच्या नाशासाठी झाला आहे. आपल्याला आता हे अंतर भरून काढायचे आहे. चौथ्या औद्योगिक क्रांतीची उभारणी ही प्रदुषणविरहित, वर्तुळाकार आणि नूतनीकरणक्षम आधारित तंत्रज्ञानावर करावयाची आहे.

परंतु, या मार्गाची सुरुवात कुठे होते? आपल्या आयुष्यात पृथ्वीविषयी जागरुकता निर्माण करून, आपण या प्रवासाला सुरुवात करू. पृथ्वीदेखील सजीव आहे. ती म्हणजे चिखल/मातीची घाण किंवा पाणी किंवा खाणकामासाठीचा पर्वत नाही. या सजीव ग्रहावर आपल्यामध्ये तिचे अस्तित्व जिवंत आहे. पृथ्वी सजीव आहे, तिने आपल्या दिलेले वरदान सजीव आहे आणि आपण तिला प्रतिष्ठापुर्वक सन्मान द्यायला हवा.

एकदा आपल्यात ही जागरुकता निर्माण झाली की, पुढचे पाऊल म्हणजे या ग्रहावरील आपल्या पाऊलखुणा कमी करणे. आपली प्रत्येक कृती किंवा आपण खरेदी करतो किंवा वापरतो त्या वस्तूचा या पृथ्वीवर परिणाम होतो. तरीही आपल्या यशाची सर्व परिमाणे- मोठी घरे, कित्येक वाहने इत्यादी पर्यावरणीयदृष्टया विषमतोल आहेत. पाणी, जीवाश्म इंधन आणि वीजेचा वापर कमी करणे हे केवळ 'स्मार्ट' नाही तर आर्थिकदृष्ट्यादेखील फायदेशीर आहे. नवे पर्याय शोधण्यासाठी आपल्याला वापराची प्रचलित पद्धत आणि जीवाश्म इंधन अर्थव्यवस्थेपासून लांब जाऊन विचार करायला हवा. पृथ्वीवरील स्त्रोत मर्यादित आहेत आणि प्रत्येकवेळी होणाऱ्या उधळपट्टीतून आपण भविष्यातील पिढ्यांचा वाटा ओरबाडत आहोत. आपण इतर लोक आणि ग्रहाचे शोषण करणाऱ्या उत्पादनांची खरेदी थांबविणे गरजेचे आहे. लक्षात ठेवा, प्रत्येकवेळी तुम्ही काहीतरी खरेदी कराल तेव्हा विचार करा, मला खरोखर याची गरज आहे का? यामुळे मला किंवा पृथ्वीला नुकसान आहे का?

वस्तूंचा वापर कमी करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे त्याचा पुनर्वापर करणे. सुरुवातीला आरओ आउटलेटमधून बाहेर पडणाऱ्या पाण्याचा वापर झाडांसाठी किंवा भांडी धुण्यासाठी करणे किंवा जुने कपड्यांचे रुपांतर पांघरुणांमध्ये करणे इत्यादी गोष्टी करता येतील. गोष्टींचा पुनर्वापर आणि रिसायकलिंग करण्यासाठी भारतात नावीन्यपूर्ण कल्पनांचा खजिना आहे. वैयक्तिकरित्या आम्ही कचऱ्याचे वर्गीकरण करतो आणि स्वयंपाकघरातील कचरा कित्येक महिने फेकून दिलेला नाही, त्याऐवजी तो कंपोस्ट करतो- त्याचे रुपांतर मातीत करतो किंवा रस्त्यावरील गायींना अन्न म्हणून देतो. त्याचप्रमाणे, युरिया आणि फॉस्फेट मोठ्या प्रमाणावर असणाऱ्या मानवी मूत्राचा खत म्हणून पुनर्वापर शहरी उद्यानांमध्ये करता येईल. ज्या गोष्टींचा पुनर्वापर असंख्य मार्गाने शक्य आहे, अशा गोष्टींचा अपव्यय शक्य तेवढा कमी व्हायला हवा. यामुळे काहीही फेकून देण्यापूर्वी, क्षणभर थांबा आणि विचार करा, याचा एखाद्या दुसऱ्या मार्गाने कसा वापर करता येईल?

गोष्टीचा वापर करण्याच्या दोन नकारात्मक पद्धतींचा त्याग केल्यास नक्कीच पर्यावरणासाठी एक मोठी सकारात्मक गोष्ट तयार होते. मनुष्य हा जगाचा मालक नाही. परंतु प्रसिद्ध अमेरिकन संवर्धन कार्यकर्ते आल्डो लिओपोल्ड यांच्या भाषेत केवळ 'जमिनीचे कारभारी' आहेत. ही जमीन आणि पृथ्वी आपल्याला आपल्या पुर्वजांकडून मिळाली आहे, परंतु केवळ आपल्या भावी पिढ्यांकडून उधार घेतली आहे. येथे आपले उद्दिष्ट लूट करणे आणि आपल्या घरात एअर-प्युरिफायरचा आराम अनुभवत असताना हवा, पाणी, माती यासारखे स्त्रोतांचे शोषण करणे नाही. आणि हवामानातील कोणतीही कृती केवळ कार्बन उत्सर्जनाच्या अनुषंगानेच बघणे, हा एकच उपाय नाही. आपल्याला गोष्टींचा पुर्ननिर्माण करण्यासाठी सकारात्मक आणि सर्वसमावेशक दृष्टीकोन बाळगणे आवश्यक आहे. कार्बनचे उत्सर्जन कमी करण्यापुरता संकुचित नकारात्मक विचार करून चालणार नाही. आपला प्रयत्न केवळ जीवाश्म-इंधन अर्थव्यवस्थेत जैविक इंधनाचा किंवा कमी कार्बन तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी नसावा. परंतु, निर्मितीचे पुनरुत्पादक तत्त्वाच्या साह्याने आपल्या आयुष्यातील प्रत्येक भागात यंत्रणाधारित दृष्टिकोन बाळगत आपली अर्थव्यवस्था आणि आयुष्याचे पुनरुत्थान करणे हा प्रयत्न असावा. आपला आर्थिक आणि सरकारी दृष्टीकोन हा बायोमिमिक्री, बायो-फिलीक रचना, पर्यावरणीय आणि वर्तुळाकार अर्थशास्त्र इत्यादी गोष्टींकडे वळवावा लागेल. एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून तुमची प्रत्येक कृती वेगळी पाहू नका परंतु संपुर्ण जगाचे प्रतिनिधित्व करणारी कृती या दृष्टीकोनातून त्याच्याकडे पहा. या ब्रम्हांडात काहीतरी भर पाडणारी आणि त्याचे कौतुक होईल अशा मार्गानेच कृती करा.

महात्मा गांधींनी सुमारे शंभर वर्षांपूर्वी आपल्यासाठी उपाय अधोरेखित करून ठेवले होते. त्यांनी त्यास स्वदेशी अर्थव्यवस्था असे नाव दिले होते. ही यंत्रणा आत्मनिर्भरता, सन्मान आणि स्थानिक सहकार्य या तीन तत्त्वांवर उभी असून तिचा पर्यावरणावर कमीत कमी किंवा सकारात्मक परिणाम आहे. खेड्यांना आत्मनिर्भर बनविणाऱ्या प्रारुपांविषयी त्यांनी मोठ्या प्रमाणात लेखन केले आहे. म्हणजे वेळ आली तर संपुर्ण जगापासून ते (खेडं) स्वतःचे संरक्षण करु शकेल, असेही त्यांच्या लिखाणात आहे. या अर्थव्यवस्थेत उत्पादनाची विकेंद्रीत प्रणाली अस्तित्वात होती, ज्यामध्ये अधिशेष एकमेकांमध्ये वाटून घेण्यात येत आणि ज्याचे उत्पादन शक्य नाही ते इतर स्त्रोताकडून खरेदी केली जात. आता भारतात पर्यावरणीय तंत्रज्ञानाच्या मदतीने स्वदेशी 2.0 अर्थव्यवस्थेचा स्वीकार करण्याची वेळ आली आहे. ही प्रक्रिया नकारात्मक नाही ज्यामध्ये बहिष्कार किंवा द्वेष आहे. स्वतःमध्ये लवचिकता निर्माण करण्यासाठीचा सकारात्मक संघर्ष आहे. एक कुटुंब आणि एक राष्ट्र या नात्याने आपण स्वतःहून बनवलेल्या सर्व गोष्टींची निर्मिती करण्यावर लक्ष द्यायला हवे. औषधापासून अन्नापर्यंत सर्व गोष्टींचे उत्पादन आपल्या नजीक व्हावे. प्रत्येकाकडे निर्णय घेण्याची शक्ती आहे, सोप्या भाषेत सांगायचे तर, आपण जास्तीत जास्त प्रमाणात स्थानिक आणि शाश्वत उत्पादनांचा वापर करायला हवा. स्वदेशी आणि शाश्वततेमध्ये गुंतवणूक करा. कोणतीही गोष्ट खरेदी करताना स्वतःला विचारा, मला याऐवजी एखादी स्थानिक किंवा शाश्वत रीतीने तयार झालेली गोष्ट घेता येईल का?

आता या प्रतिज्ञेतील शेवटचा स्तंभ- अॅग्रो इकोलॉजी. गाई-गुरे आणि कुक्कुटपालनासह औद्योगिक अन्न यंत्रणांमुळे केवळ मानवी आरोग्यच नष्ट झाले नाही तर पृथ्वीला कर्करोगाने ग्रासले आहे. शेतकरी आत्महत्या, कर्करोग, लहान शेतकऱ्यांमधील कर्जबाजारीपणा, जगभरातील ग्रामीण समुहांमध्ये होणारे गैरवर्तन आणि गुन्हे ही केवळ यंत्रणेतील विवेकहीन उत्पादनाची लक्षणे आहेत. आपल्या नद्यांचे प्रवाह खते आणि कीटकनाशकांमुळे प्रदुषित झाल्या आहेत. आणि ग्राहकालादेखील मधुमेह, नपुंसकत्व ते कर्करोग अशा विविध आजारांचा सामना करावा लागत आहे. परंतु केवळ त्या खत अनुदानामुळे भारतीय करदात्यांना मोठी किंमत मोजावी लागते.

परंतु अॅग्रो इकोलॉजी व्यवहार्य आहे. सीआयएमएमवायटी येथील प्रमुख शास्त्रज्ञ एमएल जट यांनी हे सिद्ध केले आहे. अॅग्रो इकॉलॉजीमुळे केवळ पौष्टीक आहार उपलब्ध होत नाही, तर या पद्धतीमुळे आपल्या अन्न यंत्रणेतील रसायने आणि जीवाश्म इंधनांचे प्रमाण कमी होते. याअंतर्गत पाणी स्वच्छता, कार्बन सिक्वेस्ट्रेटिंग, नायट्रोजन चक्र सामान्यीकरण आणि चवदार अन्न याद्वारे इको-सिस्टम सेवा पुरविल्या जातात.

आपण कुठून सुरुवात करु शकतो? तुमच्या घरापासून सुरुवात करा. घरात भाज्या किंवा वनस्पतींची लागवड करा. उदाहरणार्थ, लहान कुंड्यात कोथिंबीर लावा. परंतु लक्षात ठेवा यासाठी रसायनांचा वापर नको. तुमच्या आहारात ज्या गोष्टी असतात त्या लावण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला हे शक्य नसेल, तर तुमच्यासाठी अॅग्रो इकोलॉजीचा वापर करुन अन्ननिर्मिती करणाऱ्या शेतकऱ्याकडे जा. आपल्यासारख्या शहरात राहणाऱ्या लोकांनी शहरी गार्डनला पाठिंबा देणे आवश्यक आहे, जेथे आपण जे अन्न ग्रहण करतो त्याच्याशी हितगुज करु शकू आणि आपल्या मुलांना हे दाखवू शकू की, अन्न हे फ्रीजमधून नाही तर अन्नापासून मिळते.

या सर्व तत्वांची पराकाष्ठा ही हरित अर्थव्यवस्थेचा पाया आहेत, जो पुर्ननिर्माण, आर्थिक सबलीकरण आणि वर्तुळाकारतेवर आधारलेला आहे. संपुर्ण जग आर्थिक अंधकाराकडे लोटले जात आहे. अशावेळी भारताने मोडकळीस आलेल्या आर्थिक आणि औद्योगिक यंत्रणांच्या राखेतून पुन्हा उभारी घेत नवा दृष्टीकोन जवळ करायला हवा - हरित अर्थव्यवस्था. एमके गांधी यांनी निरीक्षण नोंदविल्याप्रमाणे, आपल्यामध्येच स्वदेशी अर्थव्यवस्था आहे. या पृथ्वी दिनाच्या निमित्ताने आपण आपल्या वसुधैव कुटुम्बकम परिवारासाठी प्रतिज्ञा करायला हवी आणि विज्ञान, लवचिकपणा आणि पृथ्वीच्या मार्गावर प्रवास सुरु करायला हवा.

लेखक - इंद्र शेखर सिंह, (संचालक - पॉलिसी अँड आऊटरीच, नॅशनल सीड असोसिएशन ऑफ इंडिया)

ABOUT THE AUTHOR

...view details