महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

व्यापार युद्धाच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचा तीन दिवसीय अमेरिका दौरा - India america tread

भारत-अमेरिकेमध्ये व्यापार प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू असताना परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी अमेरिकेच्या सेक्रेटरी ऑफ स्टेट मिशेल पोम्पेओ यांची भेट घेतली.

एस. जयशंकर आणि मिशेल पोम्पेओ

By

Published : Oct 1, 2019, 10:54 AM IST

वॉशिंगटन डी. सी - भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी अमेरिकेच्या सेक्रेटरी ऑफ स्टेट मिशेल पोम्पेओ यांची भेट घेतली. भारत-अमेरिकेमध्ये व्यापार प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू असताना दोघांमध्ये चर्चा झाली. यावर्षी जून महिन्यापासून दोन्ही देशांमध्ये व्यापारावरून तणाव निर्माण झाला आहे.

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर ३ दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. यावेळी ते अमेरिकेचे संरक्षण सचिव मार्क एस्पर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओ'ब्रायन यांचीही भेट घेणार आहेत.

हेही वाचा -भारत आधुनिक पायाभूत सुविधांमध्ये १.३ ट्रिलियन डॉलर्सची करणार गुंतवणूक - पंतप्रधान मोदी

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जून महिन्यात भारताचा विशेष व्यापार संबधीचा दर्जा रद्द केल्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. त्यानंतर भारतानेही अमेरिकेच्या २८ वस्तूंवरील करांमध्ये वाढ करत अमेरिकेच्या निर्णयाला प्रत्युत्तर दिले होते. विशेष व्यापारी सवलतींचा भारताला सर्वात जास्त फायदा होतो. विकसनशील देशांना 'सिस्टिम ऑफ प्रेफरन्ससेस' अंतर्गत ही सुविधा देण्यात येते.

हेही वाचा -कॅरिकॉम समिट : १४ कॅरेबियन देशाच्या प्रमुखांशी पंतप्रधान मोदींची बैठक

संयुक्त राष्ट्राच्या आमसभेच्या बैठकीवेळी पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी लवकरच व्यापार प्रश्नावर तोडगा काढण्यात येईल, असे सांगितले होते. त्या पार्श्वभूमीवर परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी अमेरिकेच्या सेक्रेटरी ऑफ स्टेट मिशेल पोम्पेओ यांच्यामध्ये चर्चा झाली.

ABOUT THE AUTHOR

...view details