नवी दिल्ली - परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी विविध देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांशी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. ऑस्ट्रेलिया, ब्राझील, जपान, इस्त्राईल, दक्षिण कोरिया या देशाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी चर्चेत सहभाग घेतला होता. कोरोनामुळे जगभरातील वाहतूक व्यवस्था कोलमडून पडली आहे, त्यावरही चर्चा झाली.
कोरोना संकट हाताळण्यासाठी भारताची विविध देशांशी परराष्ट्रमंत्री स्तरावर चर्चा - व्हिडिओ कॉन्फरन्स परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर
कोरोनाची जागतिक स्थिती, आरोग्य आणीबाणी प्रत्येक देश कसे व्यवस्थापन करत आहे, जागतिक अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्यासाठी काय करता येईल, यावर प्रामुख्याने चर्चा झाली.
कोरोना महामारीमुळे निर्माण झालेली आव्हाने, आरोग्य आणीबाणी प्रत्येक देश कसं व्यवस्थापन करत आहे, जागतिक अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्यासाठी काय करता येईल, यावर प्रामुख्याने चर्चा झाली. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी ट्विटरद्वारे याची माहिती दिली.
पहिल्यांदाच भारताने मित्र देशाच्या परराष्ट्र मंत्र्याशी ऑनलाईन चर्चा केली. कोरोनाचा उगम कसा झाला यावर अमेरिका आणि चीनमध्ये वाद सुरू आहेत. जयशंकर यांनी याआधी अमेरिकेचे परराष्ट्र सचिव माईक पोम्पेओ, रशियाचे परराष्ट्र मंत्री सेर्गी लावरो, ब्राझीलचे परराष्ट्र मंत्री एर्नेस्टो अराजो यांच्याशी कोरोना महामारीबाबत चर्चा केली.