पणजी -गोवा वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाचा ई-क्लास करण्यात आला आहे. जो नॅशनल नॉलेज लाईनद्वारे देशभरातील रुग्णालयांशी जोडण्यात आला आहे. याचे उद्घाटन गोव्याचे आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांच्या हस्ते करण्यात आले.
गोवा कॅन्सर सोसायटी आणि गोवा वैद्यकीय महाविद्यालय यांनी संयुक्तपणे 'भारतील कर्करोगाचे वाढते प्रमाण' याविषयावर महाविद्यालयाच्या सभागृहात कोलकाताच्या टाटा मेमोरियल रुग्णालयाचे डॉ. मोहनलाल मल्लत यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. याचे औचित्य साधून ई-क्लासचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी गोवा कॅन्सर सोसायटीचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपो, उपाध्यक्ष डॉ. सुरेश शेटये, डॉ. महेश नाईक, गोमेकॉचे अधिष्ठाता डॉ. शिवानंद बांदेकर आदी उपस्थित होते.