महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

ई- बाईक, गो कार्ट चॅम्पियनशिपचे विशाखापट्टणम येथे आयोजन

जागतिक तापमान वाढ , वाहनांमुळे होणारे प्रदुषण यांचे गांभीर्य  लक्षात घेऊन या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. भविष्यात अशा ई बाईकची गरज भासणार आहे.

ई- बाईक, गो कार्ट चॅम्पियनशिपचे विशाखापट्टणम येथे आयोजन

By

Published : Sep 28, 2019, 11:52 PM IST

Updated : Sep 29, 2019, 12:00 AM IST

विशाखापट्टणम -विशाखापट्टणमच्या रघू अभियांत्रिकी महाविद्यालयात ई-बाईक गो कार्ट चॅम्पियनशिपचे आयोजन करमण्यात आले आहे. देशभरातील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी या चॅम्पियनशिपमध्ये सहभाग घेतला आहे. विद्यार्थ्यांनी स्वत: तयार केलेल्या ई-बाईक आणि गो-कार्टिंग वाहनांचे प्रदर्शन येथे भरवण्यात आले आहे.

एशियन ई-बाईक चॅम्पियनशिपमध्ये 60 संघांची नोंद झाली आहे. शुक्रवारी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ई बाईकची चाचणी घेण्यात आली. अद्याप स्पर्धा सुरू झालेली नाही. या स्पर्धेतील विजेत्यांना ६ लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. मुलींनी देखील या स्पर्धेत सहभाग घेतला आहे. महाराष्ट्रातील विद्यार्थी देखील या स्पर्धेत सहभागी झाले आहेत.

Last Updated : Sep 29, 2019, 12:00 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details