नवी दिल्ली - सामाजिक कलंकाच्या भीतीने देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. अनेक संभाव्य कोरोनाग्रस्त रुग्ण आणि इतर संसर्गाची लक्षणे असणारे नागरिक समाजाच्या भीतीपोटी रुग्णालयात उपचारासाठी येत नाहीत. त्यामुळे रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले असे दिल्लीतील एम्स रुग्णालयाचे संचालक डॉ. रनदीप गुलेरिया यांनी सांगितले.
'सामाजिक कलंकाच्या भीतीनं संभाव्य कोरोनाग्रस्त रुग्णालयात येत नाहीत'
कोरोना झालेल्या रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना इतर लोकांपासून वेगळे ठेवण्यात येते. विलगीकरण करण्यात येत असल्याने कोणीही त्यांच्याशी सवांद साधत नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये आपल्याला बहिष्कृत केल्याची भावना निर्माण होते.
कोरोना झालेल्या रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना इतर लोकांपासून वेगळे ठेवण्यात येते. विलगीकरण करण्यात येत असल्याने कोणीही त्यांच्याशी सवांद साधत नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये आपल्याला बहिष्कृत केल्याची भावना निर्माण होते. त्यामुळे अनेकजण आजारी असल्याचे लक्षणे असली तरी रुग्णालयामध्ये जात नाहीत.
मागील 24 तासांत देशात कोरोनाचे 1 हजार 409 रुग्ण आढळून आले आहेत. तर देशभरात आत्तापर्यंत 21 हजार 393 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. केंद्रीय आरोग्य सचिव लव अगरवाल यांनी याची माहिती दिली.