हैदराबाद- कोरोना महामारीत मन हेलावून टाकणारी हैदराबादमध्ये घटना समोर आली आहे. मृत आईवर अंतिमसंस्कार करण्यासाठी मुलाकडे पैसे नव्हते. त्यामुळे आईचा मृतदेह फुटपाथवर ठेवून मुलगा निघून गेला. ही ह्रदय विदिर्ण करणारी घटना बंजारा हिल्समध्ये रोड क्रमांक २ वर घडली.
मन हेलावून टाकणारी घटना: अंतिमसंस्कारासाठी पैसे नसल्याने आईचा मृतदेह फुटपाथवर ठेवून मुलगा गायब - Hyderabad Latest news
पोलिसाने मृतदेहाची रविवारी ओळख पटविली आहे. मृतदेह हा रमेश या सुरक्षा रक्षकाच्या आईचा आहे. तो स्थानिक प्लाझामध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करतो. आईवर अंतिमसंस्कार करण्यासाठी पैसे नसल्याने त्याने मृतदेह फुटपाथवर ठेवल्याचे पोलिसांना सांगितले.
पोलिसाने मृतदेहाची रविवारी ओळख पटविली आहे. मृतदेह हा रमेश या सुरक्षा रक्षकाच्या आईचा आहे. तो स्थानिक प्लाझामध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करतो. आईवर अंतिमसंस्कार करण्यासाठी पैसे नसल्याने त्याने मृतदेह फुटपाथवर ठेवल्याचे पोलिसांनी सांगितले.
गेल्या तीन दिवसापासून रमेशच्या आईला ताप येत होता. अशा परिस्थितीत गरिबीमुळे त्याला उपचार करणे शक्य नव्हते. कोरोनाच्या भीतीने त्याने आईला घरात ठेवले. मात्र दुर्दैवाने तो आईला वाचवू शकला नाही. त्यानंतर आईचा मृतदेह फुटपाथवर ठेवून तो निघून गेला होता.