महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

दुबई बस दुर्घटना : ११ भारतीयांचे मृतदेह भारतात पाठवले

बस अडथळ्याला धडकून अपघात झाला. यामध्ये १२ भारतीयांबरोबरच १७ लोकांचा मृत्यू झाला. मृतदेहांना एअर इंडियाच्या विमानाने भारतात पाठवण्यात आले आहे.

प्रतिकात्मक छायाचित्र

By

Published : Jun 9, 2019, 5:07 PM IST

दुबई- बस दुर्घटनेत दुबई येथे १२ भारतीयांचा मृत्यू झाला होता. यापैकी ११ जणांचे मृतदेह रविवारी भारतात पाठवण्यात आले. तथापि एका मृतदेहावर अमिरातीतील खाडीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

संबंधित अधिकारी याबाबत बोलताना म्हणाले, सर्व मृतदेहांना ठरलेल्या वेळेत पाठवण्यात आले आहे. काल रात्री (शनिवार) ११ वाजून ४५ मिनिटाच्या सुमारास सर्व प्रकिया पूर्ण करण्यात आल्या होत्या. मृतदेहांना एअर इंडियाच्या विमानाने भारतात पाठवण्यात आले आहे.

असा झाला होता अपघात

ओमान येथून दुबईला पोहचलेली बस चुकीच्या मार्गाने जात होती. यामुळे बस अडथळ्याला धडकून अपघात झाला. यामध्ये १२ भारतीयांबरोबरच १७ लोकांचा मृत्यू झाला. बसमधील लोक ईद साजरी करण्यासाठी ओमान येथून संयुक्त अरब अमिरातीला जात होते.

दरम्यान, अपघातात मृत पावलेली रोशनी मुलचंदानी (२२) हिच्यावर शनिवारीच अंत्यसंस्कार करण्यात आले. रोशनीच्या अंत्यसंस्कारासाठी भारताहून तिचे कुटुंबिय दुबई येथे आले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details