महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

काँस्टेबलला मास्क आणि सॅनिटायझर पोहचवण्यासाठी पोलीस उपअधीक्षकांनी केला 120 किलोमीटरचा प्रवास - latest sirmour news

सहाव्या आयआरबी बटालियनमध्ये कार्यरत पोलीस उपअधीक्षक मनोज जोशी यांनी रोनहाट पोलीस चौकीत कार्यरत असणाऱ्या एका काँस्टेबलपर्यंत मास्क आणि सॅनिटायझर पोहचवण्यासाठी 120 किलोमीटरचा प्रवास केला.

DSP MANOJ JOSHI
पोलीस उपअधीक्षक मनोज जोशी

By

Published : Apr 3, 2020, 3:19 PM IST

शिलाई(हिमाचल प्रदेश) - कोरोनाच्या पार्श्वभूमिवर लावलेल्या लॉकडाऊनला यशस्वी करण्यासाठी पोलीस खूप प्रयत्न करत आहेत. त्यांचे सर्वच स्तरावरुन कौतूक होत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सहाव्या आयआरबी बटालियनमध्ये कार्यरत एका अधिकाऱ्याच्या कामामुळे त्यांचे खूप कौतूक होत आहे.

सहाव्या आयआरबी बटालियनमध्ये कार्यरत पोलीस उपअधीक्षक मनोज जोशी यांनी रोनहाट पोलीस चौकीत कार्यरत असणाऱ्या एका काँस्टेबलपर्यंत मास्क आणि सॅनिटायझर पोहचवण्यासाठी 120 किलोमीटरचा प्रवास केला. पोलीस उपअधीक्षक मनोज जोशी यांनी एका काँस्टेबलला साहित्य पुरवण्यासाठी हे पाऊल उचलल्याने त्यांचे कौतूक होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पोलीस उपअधीक्षक मनोज जोशी यांनी नम्रतेने हे सामान काँस्टेबलला दिले. त्याच्या खाण्या-पिण्याच्या आणि राहण्याच्या व्यवस्थेची चौकशी केली आणि निघून गेले. काही लोकांनी हा घटनाक्रम बघितला आणि त्यांनी माध्यमांना माहिती दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details