महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

दारूसाठी कायपण.. बेळगावात दारू खरेदीसाठी मद्यपीने पुराच्या पाण्यात घेतली उडी - दारू खरेदीसाठी पुराच्या पाण्यात उडी

दारूसाठी कायपण..! असाच काहीसा प्रकार बेळगावातील एका गावात समोर आला आहे. दारू खरेदीसाठी एकजण पुराच्या पाण्यातून पोहत गेला.

बेळगाव
बेळगाव

By

Published : Sep 27, 2020, 5:08 PM IST

बेळगाव (कर्नाटक) - दारू विकत आणण्यासाठी एकाने पुराच्या पाण्यात उडी घेतल्याचा प्रकार येथे समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ आता सर्वत्र चर्चेचा विषय आहे. मुदलागी तालुक्यातील दवळेश्वरा गावात हा प्रकार घडला. हल्लप्पा असे त्या मद्यपीचे नाव आहे.

दारूसाठी कायपण..!

हल्लप्पाला दारू हवी होती आणि विकत आणण्यासाठी नदीच्या पलीकडील बाजूस जाण्याची गरज होती. त्यामुळे त्याने अलिकडील दवळेश्वरा गावातून नदीच्या पाण्यात उडी घेतली आणि जोरात वाहणाऱ्या पाण्यातून पोहत कसाबसा दुसऱ्या बाजूचा किनारा गाठला. त्याच्या या कृतीने अनेकांची घाबरगुंडी उडाली होती. त्याला पाण्यात उडी घेण्यापासून अनेकजण अडवत होते. पण, त्याने कोणाचेही न ऐकता दारूची तल्लफ पूर्ण करण्यासाठी उडी घेतलीच. या कारनाम्यानंतरही हल्लप्पा महाशय सुखरूप आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details