महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

दारुच्या बाटलीसह जेडीयूच्या नेत्याचा नागिन डान्स, व्हिडिओ व्हायरल

जनता दल युनायडेट पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल गौरव यांचा दारूच्या बाटलीसह नाचतानाचा व्हिडिओ व्हायरला झाला आहे. यावरून विरोधकांनी नितीशकुमार यांच्यावर टीकास्त्र सोडले.

दारुच्या बाटलीसह जेडीयूच्या नेत्याचा नागिन डान्स
दारुच्या बाटलीसह जेडीयूच्या नेत्याचा नागिन डान्स

By

Published : Apr 12, 2020, 8:01 AM IST

पाटणा - बिहारमध्ये नितीश कुमार एप्रिल 2016 पासून दारू विक्री व सेवन करण्यास संपूर्णत: बंदी घातली आहे. मात्र, बंदी असूनही अवैध दारू विक्री् आणि सेवन सुरू असल्याचे पाहायला मिळाले आहे. विशेष म्हणजे जनता दल युनायडेट पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल गौरव यांचा दारूच्या बाटलीसह नाचतानाच व्हिडिओ व्हायरला झाला आहे. यावरून विरोधकांनी नितीश कुमार यांच्यावर टीकास्त्र सोडले.

सत्तेत असलेल्या पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षाने नियमांचे उल्लघंन केल्याने राष्ट्रीय जनता दल पक्षाच्या टि्वटर खात्यावरून नितीश कुमार यांच्यावर टीका केली आहे. एकिकडे बिहारमधील गरीब जनता लॉकडाऊनमुळे मरत आहे. तर दुसरीकडे दारू बंदी असातानाही सत्तेत असलेल्या पक्षाचाच प्रदेश उपाध्यक्ष दारूच्या बाटलीसह नाचत असून मजा करत आहे. यातून हेच स्पष्ट होते की, राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात मुख्यमंत्र्याना अपयश आले आहे.

तसेच माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी टि्वट करत विशाल गौरव यांच्यावर कारवाई करण्याचे आवाहन केले आहे. संबधित व्यक्तीस लवकर अटक करण्यात यावी. कायद्याचे उल्लंघन करणार्‍या या व्यक्तीस अटक केली गेली नाही. तर याचा स्पष्ट अर्थ असा आहे की, सरकार स्वतः कायद्याचे उल्लंघन करीत आहे, असे तेजस्वी यादव यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.

मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी 1 एप्रिल 2016 मध्ये राज्यात दारू बंदी लागू केली होती. विशेष करून महिलांनी दारूबंदीला चार दिवसात पाटणा व इतर शहरात प्रचंड मोठा प्रतिसाद दिल्याने दारूवर पूर्ण बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. राजद अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी ताडीवर बंदीला त्या व्यवसायातील लोकांची रोजीरोटी जाईल असे सांगून विरोध केला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details