गुवाहाटी - शहरातील माळीगाव भागामध्ये टेम्पोतून प्रवास करणाऱ्या दोन मुलींना जबरदस्तीने ड्रग्सचे इंजेक्शन दिल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. संबधित मुली ह्या शहरातील पांडू महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी असल्याची माहिती आहे.
ड्रग्सचे इंजेक्शन दिल्यानंतरही 'त्या' तरुणींनी मारली धावत्या टेम्पोमधून उडी - माळीगाव
गुवाहाटी शहरातील माळीगाव भागात टेम्पोमध्ये प्रवास करणाऱ्या दोन मुलींना जबरदस्तीने ड्रग्सचे इंजेक्शन दिल्याची घटना घडली आहे.
![ड्रग्सचे इंजेक्शन दिल्यानंतरही 'त्या' तरुणींनी मारली धावत्या टेम्पोमधून उडी](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4213140-thumbnail-3x2-ghu.jpg)
ड्रग्सचे इंजेक्शन दिल्यानंतरही 'त्या' तरुणींनी मारली धावत्या टेम्पोमधून उडी
ड्रग्सचे इंजेक्शन दिल्यानंतरही 'त्या' तरुणींनी मारली धावत्या टेम्पोमधून उडी
टेम्पोमध्ये प्रवास करत असताना त्यांना जबरदस्तीने ड्रग्सचे इंजेक्शन दिल्यानंतर त्या दोघी घाबरल्या. मात्र, त्यांनी हिम्मतीने टेम्पोमधून उडी मारली. त्यामुळे दोन्ही मुलींना गंभीर दुखापत झाली असून त्यांना शहरातील संजीवनी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एका मुलीची प्रकृती चिंताजनक असून दुसरी मुलगी गंभीर जखमी आहे.
याप्रकरणी मुलींच्या कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. मात्र, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पोलिसांनी टेम्पोच्या चालकास चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.