श्रीनगर -पाकिस्तानी लष्कराकडून जम्मू काश्मिरातील दहशतवाद्यांना शस्त्रे पुरवण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात येत असल्याचे समोर आल्यानंतर सुरक्षा दलांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नुकतेच सीमेवरील अनेक ठिकाणी शस्त्रे पुरवण्यासाठी ड्रोनचा वापर केल्याचा संशयही सुरक्षा दलांनी व्यक्त केला आहे.
१५ कॉर्प्स कमांडिंग अधिकारी जनरल बी. एस राजू यांनी सांगितले की, 'पीरपांजल भागात सैन्याला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नियंत्रण रेषेवर कोणत्याही उडणाऱ्या वस्तूवर बारकाईनं लक्ष ठेवण्याचे आदेश सुरक्षा दलांना देण्यात आले आहेत. काश्मिरातील दहशतवाद्यांना शस्त्र आणि दारुगोळ्याचा मोठा तुटवडा भासत आहे. त्यामुळे सीमेपलीकडून मदत मिळवण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत'.