नवी दिल्ली - राजधानी दिल्लीमध्ये परिसर निर्जंतुकीकरण करण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात येत आहे. शहरातील 'मजनू का टिला' परिसराचे निर्जंतुकीककरण करण्यासाठी प्रशासनाकडून ड्रोनचा वापर करण्यात येत आहे. दिल्ली सरकारकडून कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. घराबाहेर पडताना तोंडाला मास्क लावणे शहरात बंधनकारक करण्यात आले आहेत.
दिल्लीत परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी ड्रोनचा वापर
मरकज तबलिगी कार्यक्रमानंतर शहरात झपाट्याने कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. दिल्लीत 900 पेक्षा जास्त कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत.
मरकज तबलिगी कार्यक्रमानंतर शहरात झपाट्याने कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. दिल्लीत 900 पेक्षा जास्त कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. ड्रोनद्वारे निर्जंतुकीकरण करण्याबरोबरच टँकरद्वारेही परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. दिल्ली सरकारने जास्त कोरोनाचा फैलाव झालेले परिसर सील करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आत्तापर्यंत 30 असे ठिकाणी निवडली आहेत तेथे जास्त कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून परिसर सील करण्यात आला आहे.
मागील 24 तासांत देशभरात 37 जणांचा मृत्यू झाला असून 896 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर एकून कोरोनाग्रस्तांची संख्या 6 हजार 6761 झाली आहे. यातील 6 हजार 39 अॅक्टिव्ह केसेस आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.