नवी दिल्ली – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने दिलासा वाहन चालकांना दिला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने वाहन चालक परवान्याची मुदत आणि त्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची वैधता 31 डिसेंबर 2020 पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
वाहन चालकांना दिलासा! ड्रायव्हिंग लायसन्सह कागदपत्रांच्या वैधतेत 31 डिसेंबरपर्यंत वाढ - Motor Vehicle Rules documents in pandemic
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने फिटनेस, परमिट्स, लायसन आणि मोटार वाहन कायदा 1988 आणि केंद्र सरकार मोटार वाहन कायदा 1989 अंतर्ग लागणारी कागदपत्रांची वैधता 31डिसेंबर 2020 वाढविली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने कागदपत्रांची वैधता 30 सप्टेंबरपर्यंत वाढविण्याचा यापूर्वी निर्णय घेतला आहे.

जी वाहनांबाबतची कागदपत्रे 1 फेब्रुवारी 2020 नंतर अवैध ठरणार होती, अशी कागपत्रे 31 डिसेंबर 2020 पर्यंत वैध ठरणार आहेत. टाळेबंदीमुळे अनेक वाहन चालकांना कागदपत्रे सरकारी कार्यालयात जमा करण्यात अडथळे आले आहेत. सरकारी नियमांप्रमाणे वाहन चालकांना त्यांची कागदपत्रे अद्ययावत ठेवावी लागतात. अन्यथा वाहन चालकांना वेगगेगळ्या प्रकारचे शुल्क भरावे लागते. सरकारने 31 डिसेंबरपर्यंत दिल्याने वाहन चालकांना दिलासा मिळणार आहे.
TAGGED:
ड्रायव्हिंग लायसन न्यूज