कोलकाता - महसूल संचलनालयाने (डीआरआय) शनिवारी २.७ किलो सोने जप्त केले. म्यानमारहून तस्करी करून हे सोने भारतात आणले होते. पश्चिम बंगालमधील कोलकात्याजवळच्या एका रेल्वे स्थानकावर ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आले असून, या सोन्याची किंमत सुमारे १.१३ कोटी असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
डीआरआय मिळालेल्या माहितीवरून, डीआरआयने शुक्रवारी रात्री दस्खिनेश्वर रेल्वे स्थानकावर आपला सापळा रचला होता. त्यावेळी कांचनजुंघा एक्सप्रेस (१३१७४) ही गाडी स्थानकावर दाखल झाली. त्यानंतर संध्याकाळी ७.२० च्या सुमारास डीआरआयने दोन संशयित व्यक्तींना पाहिले. त्यांचे वर्णन डीआरआयला मिळालेल्या माहितीशी मिळतेजुळते होते. त्यामुळे त्या दोघांनाही ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता, त्यांच्याकडे हे सोने मिळाले.