महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

अंत्योदय विकासाला माझा प्राधान्य क्रम असेल - मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत - bjp

माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सुरू केलेली विकासकामे पुढे नेणे ही माझ्यावर मोठी जबाबदारी असेल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर व्यक्त केली. त्यांच्यासह अकरा मंत्र्यांना राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांनी गोपनीयतेची शपथ दिली.

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा

By

Published : Mar 19, 2019, 4:10 AM IST

पणजी - 'अंत्योदय विकासाला माझा प्राधान्यक्रम असेल. त्याबरोबच माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सुरू केलेली विकासकामे पुढे नेणे ही माझ्यावर मोठी जबाबदारी असेल,' अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर दिली. त्यांच्यासह अकरा मंत्र्यांना राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांनी गोपनीयतेची शपथ दिली.

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा


माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निधनामुळे डॉ. सावंत यांचा आज मुख्यमंत्री शपथविधी झाला. तर, महाराष्ट्रावादी गोवा पक्षनेते सुदीन ढवळीकर आणि गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांना उपमुख्यमंत्री म्हणून शपथ देण्यात आली.


पर्रीकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर नवा गटनेता निवडण्यासाठी रविवार रात्री पासून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत भाजप, मगो आणि गोवा फॉरवर्ड आमदारांशी चर्चा करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर सोमवारी रात्री डॉ. सावंत यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यानंतर राजभवनातील दरबार हॉलमध्ये शपथ देण्यात आली. यावेळी डॉ. सावंत यांचे कुटुंबीय आणि भाजप पदाधिकारी उपस्थित होते.


डॉ. सावंत, जयेश साळगावकर, गोविंद गावडे, विनोद पालयेकर, रोहन खंवटे, विजय सरदेसाई यांनी कोकणी भाषेत मंत्रीपदांची शपथ घेतली. सुदिन ढवळीकर, बाबू आजगावकर आणि मिलिंद नाईक यांनी मराठीत तर, विश्वजीत राणे, मॉविन गुदिन्हो आणि नीलेश काब्राल यांनी इंग्रजीत शपथ घेतली.


डॉ. सावंत म्हणाले, 'विकास हा दोन प्रकारचा असतो. एक म्हणजे मानवी आणि दुसरा पायाभूत साधन-सुविधांचा विकास. यापूर्वी या पदावर राहून पर्रीकर यांनी या दोन्ही प्रकारांत समतोल साधला होता. ते दूरदृष्टी असलेले नेते होते. त्यांनी सुरू केलेली विकास कामे पुढे नेण्याची माझ्यावर जबाबदारी आहे.'


'राज्यात स्थिरता असावी यासाठी हे सरकार आहे. नव्याने स्थापन करण्यात आले नसून असलेली धुरा पुढे नेत आहोत,' असे गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई म्हणाले.


तत्पूर्वी, मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतरचा दुसरा दिवस गोव्यात वेगवान राजकीय घडामोडींचा ठरला. रिक्त झालेल्या जागेवर प्रमोद सावंत यांची निवड करण्यात आली. प्रमोद सावंत गोवा विधानसभेचे अध्यक्ष होते. ते व्यवसायाने आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. डॉ. प्रमोद सावंत यांचा जन्म २४ एप्रिल १९७३ रोजी झाला. डॉ. प्रमोद सावंत हे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे ते अत्यंत निकटवर्तीय होते, असेही सांगितले जाते.

ABOUT THE AUTHOR

...view details