लखनौ - बहुजन समाजातील कोट्यवधी लोकांचे आयुष्य बदलणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची घोषणा गुजरातमध्ये चुकीच्या पद्धतीने शिवकवली जात आहे, असा आरोप बसपाच्या प्रमुख मायावती केला आहे. यामध्ये लवकर सुधारणा करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे.
'शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा, हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मुलमंत्र दलित आणि मागासवर्गीय लोकांना पुढे जाण्याची प्रेरणा देतो. मात्र, ही घोषणा गुजरात सरकारच्या पुस्तकांमध्ये चुकीच्या पद्धतीने शिकवली जात आहे. यातूनच काँग्रेसप्रमाणेच भाजपचा दलितविरोधी चेहरा समोर आला आहे, असे त्यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.
बहुजन समाज पक्षाच्या आमदाराने मोठा गौप्यस्फोट केला आहे. मायावतींच्या पक्षामध्ये पैसे घेऊन तिकीट दिले जाते असे त्यांनी म्हटले आहे.'आमच्या बहुजन समाज पक्षांमध्ये पैसे घेऊन तिकीट दिले जाते. जर कोणी जास्त पैसे दिले तर पहिले दिलेले तिकिट रद्द करून ते दुसऱ्याला दिले जाते. यात जर आणखी एखाद्या व्यक्तीने जास्त पैसे दिले तर ते तिकीट त्याला दिले जाते', असा गौप्यस्फोट राजस्थान विधानसभेत गुढा यांनी केला होता.
बहुजन समाज पक्षावर या प्रकारचे आरोप यापूर्वीही झाले आहेत. गेल्या वर्षी विधान परिषदचे माजी सदस्य मुकुल उपाध्याय यांनी बसपावर अलिगढमधून तिकीट देण्यासाठी पैसे मागितल्याचा आरोप केला होता. मायवती यांनी त्यांच्याकडे 5 कोटी रुपये मागितल्याचे त्यांनी म्हटले होते.