महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

आओ दिया जलायें! 'या' मान्यवरांनी केले दिवे लावण्याचे देशवासियांना आवाहन - अरुण गोविल

रामानंद सागर यांच्या रामायन मालिकेतील रामच्या भूमिका साकारलेले अरुण गोविल, अध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर तसेच गिर्यारोहक मेघा परमार यांनी पंतप्रधान मोदींच्या आवाहनाचे स्वागत केले आहे.

By

Published : Apr 5, 2020, 8:54 PM IST

नवी दिल्ली - कोरोना प्रसाराच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना एकत्र येत रविवारी म्हणजे आज रात्री 9 वाजता घरातील सर्व लाइट्स बंद करुन दिवा आणि मेणबत्ती लावण्याचे आवाहन केले. त्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकेची झोड उठली तसेच काही जणांनी मोदींच्या आवाहनाला पाठींबा दिला आहे.

रामानंद सागर यांच्या रामायन मालिकेतील रामच्या भूमिका साकारलेले अरुण गोविल, अध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर तसेच गिर्यारोहक मेघा परमार यांनी पंतप्रधान मोदींच्या आवाहनाचे स्वागत केले आहे. तिघांनी देशवासियांना रात्री 9 वाजता आपल्या घरी दिवे लावण्याचे आवाहन केले आहे.

कोरोना प्रसाराच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांसाठी एक व्हिडिओ संदेश जारी केला होता. ' 5 एप्रिलला सर्वांनी रात्री 9 वाजता आपल्या घरातील लाईट बंद करून घरातील दारासमोर, गँलरीमध्ये मेणबत्ती, दिवा, बँटरी किंवा मोबाईलची फ्लॅश लाइट सुरू ठेवा. या माध्यमातून आपण करोनामुळे पसरलेला अंध:कार दूर करू, असे अवाहन मोदींनी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details