महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'हाऊडी मोदी'...अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानला ताकीद

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ह्युस्टनमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या 'हाऊडी मोदी' या विषेश कार्यक्रमाला उपस्थित राहतील अशी घोषणा झाल्यानंतर, पाकिस्तान आणि चीनमधील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष इतर कोणत्याही देशाच्या राष्ट्राध्यक्षांच्या कार्यक्रमात सहभागी होण्याची कदाचित ही पहिलीच वेळ असेल. परराष्ट्र धोरणांचा गंभीरपणे विचार केल्यानंतरच असे निर्णय घेतले जातात.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

By

Published : Sep 21, 2019, 5:28 PM IST

तीन दिवसांपूर्वी, व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्याने 22 सप्टेंबरला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ह्युस्टनमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या 'हाऊडी मोदी' या विषेश कार्यक्रमाला उपस्थित राहतील अशी घोषणा केली. त्यानंतर, पाकिस्तान आणि चीनमधील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. हे ट्रम्प यांचे नाटक आहे की, या निर्णयाद्वारे भारत-अमेरिका संबंध नव्या पातळीवर पोहोचल्याचा संदेश देण्याचा अमेरिका प्रयत्न करत आहे, अशा आशयाच्या चर्चा पाकिस्तानी वृत्त वाहिन्यांवर रंगत आहे.

हेही वाचा -Howdy Modi : पंतप्रधान मोदी आठ दिवसांच्या अमेरिका दौऱ्यासाठी रवाना

अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष इतर कोणत्याही देशाच्या राष्ट्राध्यक्षांच्या कार्यक्रमात सहभागी होण्याची कदाचित ही पहिलीच वेळ असेल. परराष्ट्र धोरणांचा गंभीरपणे विचार केल्यानंतरच असे निर्णय घेतले जातात. जागतिक राजकारणाच्या पटलावर चीन आणि पाकिस्तानला जुळे भाऊ म्हणून पाहिले जात होते. कलम 370 आणि 35 अ रद्द झाल्यानंतर पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताविरूद्ध पाठिंबा मिळवण्यासाठी मोहीम सुरू केली. पण, चीन आणि तुर्की वगळता कोणत्याही देशाने भारताच्या निर्णयाच्या विरोधात निवेदन दिले नाही. अमेरिकेच्या प्रशासनाने मात्र स्पष्टपणे सांगितले होते की, ही भारताची अंतर्गत बाब आहे.

ट्रम्प यांनी काश्मीर प्रकरणात मध्यस्थी करून इम्रान खान यांना संतुष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, भारताने हे प्रयत्न निष्फळ ठरवले. आता मोदींच्या रॅलीत सहभागी होण्याची घोषणा करून ट्रम्प यांनीही काश्मिरच्या मुद्यावर भारताविरूद्ध पाठिंब्याची अपेक्षा करू नये, असा स्पष्ट संदेश पाकिस्तानला दिला आहे. अमेरिका-भारत संबंधांच्या संदर्भात आता पाकिस्तानला महत्त्व राहिलेले नाही.

हेही वाचा -पाकच्या कुरापती सुरूच, पुंछमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन

गेल्या महिन्यापासून ज्या प्रकारे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान भारताला अण्वस्त्र हल्ला करण्याची धमकी देत ​​आहेत, त्यानुसार अमेरिकी प्रशासनाने 'पाकिस्तान हा बेजबाबदार देश आहे' असा निष्कर्ष काढला आहे. पाकिस्तानलाही भूतकाळातील घटनांवरून आता कळले आहे की, अमेरिकेला काश्मीरमध्ये हस्तक्षेप करायचा नाही. ट्रम्प यांनी मोदींच्या रॅलीत भाग घेतल्यामुळे हे स्पष्ट होईल की, भारत-अमेरिका संबंध पाकिस्तानच्या प्रभावापासून पूर्णपणे मुक्त झाले आहेत. पाकिस्तानला आता फक्त एक चिडचिडा घटक म्हणून पाहिले जात आहे. ज्याला, केवळ काही काळ सहन केले जावे.

ABOUT THE AUTHOR

...view details