नवी दिल्ली- अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उद्या भारताच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यानिमित्त भारतात जय्यत तयारी केली जात आहे. ट्रम्प हे सुद्धा भारतात येण्यासाठी उत्सुक आहेत. भारत दौऱ्यावर निघण्याच्या काही तास आधी डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रसिद्ध बाहुबली २ चित्रपटातील एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओमध्ये बाहुबलीच्या चेहऱ्याच्या जागी ट्रम्प यांचा चेहरा एडिट केलेला आहे.
VIDEO: डोनाल्ड ट्रम्प बाहुबलीच्या वेशात.....खुद्द ट्रम्प यांनी शेअर केला मजेशीर व्हिडिओ - morphed video trump
एका ट्विटर युझरने हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर खुद्द ट्रम्प यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. एका चांगल्या मित्राकडे जाण्यासाठी उत्सुक असल्याचं ट्रम्प यांनी या व्हिडिओला कॅप्शन दिलं आहे.

डोनाल्ड ट्रम्प बाहुबली व्हिडिओ
एका ट्विटर युझरने हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर खुद्द ट्रम्प यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. एका चांगल्या मित्राकडे म्हणजेच भारतात येण्यासाठी उत्सुक असल्याचं ट्रम्प यांनी या व्हिडिओला कॅप्शन दिलं आहे. तब्बल ७० हजार जणांनी या व्हिडिओला लाईक केलं आहे.