वॉशिंग्टन - जम्मू-काश्मीर प्रश्नावर मध्यस्थी करण्याबाबत डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा वक्तव्य केले आहे. भारत आणि पाकिस्तान तयार असेल तर काश्मीर प्रश्न सोडविण्यासाठी मी मध्यस्थी करायला तयार आहे, असे ट्रम्प म्हणाल्याची माहिती एका वृत्तसंस्थेने दिली आहे.
मोदींनी काश्मीर प्रश्नी मध्यस्थी करण्यासाठी मला विनंती केली होती, असे ट्रम्प यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या अमेरिका दौऱ्यावेळी सांगितले होते. मात्र, भारताने ट्रम्प यांचा दावा फेटाळला आहे. परंतु, मध्यस्थी करायला तयार असल्याचा पुनरुच्चार ट्रम्प यांनी पुन्हा केला आहे. मी इम्रान खान आणि नरेंद्र मोदी दोघांशीही बोललो आहे, ते दोघेही खूप चांगले आहेत. दोन्ही देशांमध्ये चर्चा होण्याचा निर्णय आता मोदींच्या हातात आहे. मी याप्रश्नी मदत तयार करण्यास तयार असल्याचे ट्रम्प म्हणाले.