नवी दिल्ली -अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा एक मीम व्हिडीओ सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल झाला होता. तोच व्हिडीओ व्हाईट हाऊसचे सोशल मीडिया मुख्य डैन स्काविनो यांनी त्यांच्या टि्वटरवर शेअर केला आहे.
Video : जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मल्हारी गाण्यावर थिरकतात - डैन स्काविनो
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा एक मीम व्हिडीओ सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल झाला होता. तोच व्हिडीओ व्हाईट हाऊसचे सोशल मिडीया मुख्य डैन स्काविनो यांनी त्यांच्या टि्वटरवर शेअर केला आहे.
तिरस्कार करणाऱ्यांना पागल करण्याचा माझा हेतू नाही. मात्र एका सुंदर आठवड्याचा शेवट आणि एका सुंदर दिवसाची सुरुवात या गाण्याच्या माध्यमातून करता येईल असे त्यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे. डैन स्काविनो हे व्हाईट हाऊसचे सोशल मिडीयाचे मुख्य अधिकारी आणि राष्ट्रपतीचे सहायक आहेत. ट्रम्प यांच्या 2016 अभियानाच्या सोशल मिडीयाचे मुख्य अधिकारी होते.
देशातील जी लोक डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या कार्यप्रणालीचा तिरस्कार करतात. त्यांच्यासाठी त्यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये रणवीर सिंह मल्हारी गाण्यावर थिरकताना पाहयला मिळतो. हा व्हिडीओ तयार केलेला असून त्यामध्ये रणवीरच्या जागी ट्रम्प यांचा चेहरा लावण्यात आलेला आहे.