लखनऊ - उत्तर प्रदेश सरकारला संविधानाने मजूरांना दिलेले हक्क काढून घ्यायचे आहेत का, असा प्रश्न काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांंनी उपस्थित केला आहे. राज्य सरकारने 'मायग्रंट कमिशन' स्थापन केल्याची घोषणा केल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
या मजुरांची मदत करायची सोडून, योगी सरकारने असा निर्णय घेतला आहे ज्यामुळे इतर राज्यांनाही त्यांना काम देता येणार नाही. या मजूरांनी आपल्याच राज्यात अडकून राहावे अशी राज्य सरकारची इच्छा आहे का? अशा आशयाचे ट्विट गांधी यांनी केले आहे. मजूरांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही राजकारण बाजूला ठेऊन सरकारची मदत करण्यास तयार आहोत. मात्र, त्यांची मदत करू शकलो नाही तरी आम्ही या सरकारला त्यांच्या समस्या आणखी वाढवू देणार नाही, असेही त्या म्हणाल्या.