नवी दिल्ली - पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेल्या डॉक्टरांच्या संपाची धग आता संपूर्ण देशात पोहोचली आहे. आज दिल्लीसह महाराष्ट्र आणि इतर राज्यांतील डॉक्टरांनी या आंदोलनात उडी घेतली असून रुग्णसेवा बंद केली आहे. त्यामुळे रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत.
बंगालमधील एका डॉक्टरला मारहाण केल्याप्रकरणी मेडिकल असोशिएशनने रोष व्यक्त केला. या घटनेने आता राजकीय वळण घेतले आहे. मागील ४ दिवसांपासून सुरू असलेल्या डॉक्टरांच्या संपाला ममतांनी प्रतिसाद दिला नाही. त्यांनी डॉक्टरांना तत्काळ संप मागे घेऊन कामावर रूजू होण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, ममतांच्या या पवित्र्यामुळे प्रकरण आणखीच चिघळले असून देशातील इतर राज्यांतील डॉक्टरांनीही या संपात सहभाग घेतला आहे.