बापरे! रूग्णाच्या पोटातून बाहेर काढले ८ चमचे, २ टूथब्रश आणि १ चाकू - stomach
ही व्यक्ती मानसिक रुग्ण असल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे. हा प्रकार दुर्मीळ असल्याचे डॉक्टर निखिल यांनी म्हटले आहे.
![बापरे! रूग्णाच्या पोटातून बाहेर काढले ८ चमचे, २ टूथब्रश आणि १ चाकू](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3379480-thumbnail-3x2-hm.jpg)
शिमला - हिमाचल प्रदेशात डॉक्टरांनी एका रूग्णाच्या पोटातून ८ चमचे, २ स्क्रू ड्रायव्हर, २ टूथब्रश आणि स्वयंपाक घरात वापरातला १ चाकू बाहेर काढला आहे. ३५ वर्षीय रूग्णाच्या पोटातून हे सगळे सापडल्याने डॉक्टरांना धक्का बसला. हिमाचल प्रदेशात ही घटना घडली. येथील लाल बहादुर शास्त्री सरकारी रूग्णालयात ही शस्त्रक्रिया झाली. ही व्यक्ती मानसिक रुग्ण असल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे.
२४ मे रोजी या रूग्णाला या रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्याच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली आणि आम्ही त्याच्या पोटातून चमचे, स्क्रू ड्रायव्हर आणि चाकू बाहेर काढला. या रूग्णाचे नाव समजू शकलेले नाही. मानसिक रुग्ण असलेल्या या व्यक्तीने या सर्व वस्तू गिळल्या असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. हा प्रकार दुर्मीळ असल्याचे डॉक्टर निखिल यांनी म्हटले आहे.