श्रीनगर -जम्मू काश्मीरातील श्रीनगर येथील एसएमएचएस आणि सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील दोन निवासी डॉक्टरांना आरोग्य कर्मचाऱ्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली. इतर डॉक्टर आपला जीव वाचवून रुग्णालयाच्या बाहेर पळून गेले. अपुऱ्या सुविधा मिळत असल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले होते. त्यातून हा वाद झाला.
आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मारहाणीत काश्मिरात दोन डॉक्टर जखमी - काश्मिरात डॉक्टरांना मारहाण
नर्स आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांनी अपुऱ्या सुविधा मिळत नसल्यामुळे संप पुकारला होता. त्याचे पर्यावसन डॉक्टरांबरोबरच्या भांडणात झाले. कार्डिओलॉजी विभागातील दोन डॉक्टरांना मारहाण करण्यात आली आहे.

नर्स आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांनी अपुऱ्या सुविधा मिळत नसल्यामुळे संप पुकारला होता. त्याचे पर्यावसन डॉक्टरांबरोबरच्या भांडणात झाले. कार्डिओलॉजी विभागातील दोन डॉक्टरांना मारहाण करण्यात आली आहे. सुरक्षा रक्षकाने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता, त्यालाही बेदम मारहाण केली आहे.
ईटीव्ही भारतशी बोलताना डॉक्टर्स असोशिएशनचे अध्यक्ष सुहिला नाईक म्हणाल्या, ही घटना दुर्दवी आहे. संपूर्ण जग कोरोनाशी लढा देत असताना डॉक्टरांना मारहाण होण्याची घटना नकारात्मक परिणाम करणारी आहे. या प्रकरणी आत्तापर्यंत तिघांना अटक करण्यात आली असून तपास सुरु आहे.