महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

उत्तर प्रदेशातील मिर्झापूर जिल्ह्यात डॉक्टर रहस्यमयरित्या बेपत्ता; शोध सुरू

डॉ. त्रिपाठी शनिवारी वाराणसी येथून चारचाकी वाहनातून मिर्झापूर येथे जात होते. भातुली येथील गंगा नदीच्या पुलावर त्यांनी चालकाला गाडी थांबवायला सांगितले आणि ते गाडीतून उतरले. यानंतर 15 मिनिटे झाल्यानंतरही ते परत आले नाहीत. मिर्झापूर पोलिसांनी शोधकार्य सुरू केले आहे.

Doctor reported missing in UP
उत्तर प्रदेशात डॉक्टर बेपत्ता

By

Published : Aug 23, 2020, 5:32 PM IST

मिर्झापूर - उत्तर प्रदेश राज्यातील मिर्झापूर जिल्ह्यातील विभागीय रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टर जे.पी.त्रिपाठी शनिवारी रहस्यमयरित्या बेपत्ता झाले आहेत, अशी माहिती पोलिसांनी आज दिली आहे. त्रिपाठी वाराणसी येथून चारचाकी वाहनातून मिर्झापूर येथे जात होते. भातुली येथील गंगा नदीच्या पुलावर त्यांनी चालकाला गाडी थांबवायला सांगितले आणि ते गाडीतून उतरले. यानंतर 15 मिनिटे झाल्यानंतरही ते परत आले नाहीत.

त्रिपाठी यांचा शोध घेण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात अलर्ट जारी करण्यात आला आहे. एनडीआरएफच्या पथकांना गंगा नदीमध्ये डॉ. त्रिपाठी यांचा शोध घेण्याच्या सूचना दिल्याचे पोलीस अधीक्षक अजय सिंह यांनी सांगितले. 55 वर्षीय डॉ.त्रिपाठी त्यांच्या वाहनाने वाराणसीवरून मिर्झापूरला निघाले होते. गंगा नदीवरील पुलावर आल्यानंतर ते गाडीतून उतरून निघून गेले. 15 मिनिटांनपेक्षा अधिक वेळ झाल्यानंतर ते आले नाहीत. यामुळे चालकाने परिसरात शोध घेतला. मात्र, त्रिपाठी यांचा शोधल लागला नाही, यानंतर चालकाने त्रिपाठी यांच्या पत्नीला याबाबत माहिती दिली.

हेही वाचा-मध्यप्रदेश : ४ वर्षांच्या मुलासह एकाच कुटुंबातील ५ जण आढळले गळफास लावलेल्या स्थितीत

डॉ.जे.पी.त्रिपाठी यांच्या पत्नी डॉ. सुनंदा त्रिपाठी यांनी त्यानंतर ही माहिती पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी तातडीने शोधकार्य सुरू केले आहे. त्रिपाठी यापूर्वी बस्ती येथे वैद्यकीय अधिकारी या पदावर कार्यरत होते. जुलै महिन्यात ते मिर्झापूर येथील विभागीय रुग्णालयात रुजू झाले होते. कोरोना प्रादुर्भावाच्या काळात अनेक रुग्णांची तपासणी करावी लागल्याने त्रिपाठी मानसिक तणावात होते, असे वाहनचालकाने त्यांच्या परिवाराला सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details