महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

पोटदुखीवर उपचारासाठी गेलेल्या महिलेच्या औषधांच्या चिट्ठीवर डॉक्टरांनी लिहिले 'कंडोम'

महिला पोटदुखीवर उपचार करण्यासाठी डॉक्टर असरफ बदर यांच्याकडे गेली होती. यानंतर रुग्नालयात काम करणाऱ्या डॉक्टरांनी महिलेच्या औषधाच्या कागदावर कंडोम लिहून दिले. महिला हा कागद घेऊन औषधीच्या दुकानावर गेली, तेव्हा दुकानदाराने कागदावर लिहिलेले औषधी कंडोम असल्याचे सांगितल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे.

औषधीच्या कागदावर डॉक्टरांनी लिहीले 'कंडोम'

By

Published : Jul 29, 2019, 2:20 PM IST

रांची -पोटदुखी असलेल्या रुग्ण महिलेला औषधांच्या कागदावर डॉक्टरांनी कंडोम लिहून दिल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. यानंतर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना चौकशीला सामोरे जावे लागणार आहे.

मिळालेल्या माहितीनूसार २३ जुलैला पश्चिम सिंहभूम जिल्हात घाटशिला सरकारी रुग्नालयात, एक चतुर्थ श्रेणीची महिला कर्मचारी पोटदुखीवर उपचार करण्यासाठी डॉक्टर असरफ बदर यांच्याकडे गेली होती. यानंतर रुग्नालयात काम करणाऱ्या डॉक्टरांनी महिलेच्या औषधाच्या कागदावर कंडोम लिहून दिले. महिला हा कागद घेऊन मेडिकल स्टोरमध्ये गेली, तेव्हा दुकानदाराने कागदावर लिहिलेले औषध कंडोम असल्याचे सांगितले होते.


महिलेने या घटनेची तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली आहे. यानंतर हा मुद्दा झारखंड मुक्ति मोर्चाचे आमदार कुणाल सारंगी यांनी विधानसभेत उपस्थित केला. महिलेने केलेल्या तक्रारीच्या आधारावर तज्ञ अधिकाऱ्यांच्या समितीचे गठन करण्यात आले. या समितीने रविवारपासून पडताळणी सुरू केली आहे.


या संदर्भात घाटशिला उप विभागीय रूग्नालयाचे प्रभारी शंकर टुडू यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले, 'महिलेने केलेल्या तक्रारीच्या आधारावर तज्ञ अधिकाऱ्यांच्या समितीचे गठन करण्यात आले असून या समितीने पडताळणी सुरू केली आहे.' तसेच या संदर्भात केल्या जानाऱ्या सर्व आरोपांचे त्यांनी खंडन केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details