हैदराबाद - शहरातील गांधी रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांवर मंगळवारी मृत कोरोना रुग्णाच्या नातेवाईकांकडून हल्ला झाल्याची घटना घडली. त्यावर रुग्णालयातील कनिष्ठ डॉक्टरांनी मंगळवारी रात्री रुग्णालयाबाहेर निदर्शन करत डॉक्टरांच्या संरक्षणासाठी विशेष संरक्षण दल गठित करण्याची मागणी तेलंगणा सरकारकडे केली आहे.
हैदराबादमध्ये कोरोना रुग्णाच्या नातेवाईकांकडून डॉक्टरांवर हल्ला
शहरातील गांधी रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांवर मंगळवारी मृत कोरोना रुग्णाच्या नातेवाईकांकडून हल्ला झाल्याची घटना घडली. त्यानंतर कनिष्ठ डॉक्टरांनी रुग्णालयाबाहेर निदर्शने करत तेलंगणा सरकारकडे कोरोना प्रभागात ड्यूटीवर असलेल्या डॉक्टरांच्या संरक्षणासाठी विशेष संरक्षण दल गठित करण्याची मागणी केली.
डॉक्टरांच्या मते, रविवारी 55 वर्षांच्या एका व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना श्वसनाची समस्या होती, तसेच त्यांची कोरोनाची चाचणीही पॉझिटिव्ह आली होती. त्यामुळे रुग्णावर अती दक्षता विभागात उपचार सुरू होते. रुग्णाला सीपीएपी मशीनद्वारे ( कृत्रिम श्वास) श्वास देण्यात येत होता. मात्र, रुग्णाने स्वच्छता गृहात जाताना कृत्रिम श्वास देणारे यंत्र काढले. त्यामुळे श्वास घेण्यास त्रास झाल्याने रस्त्यामध्येच रुग्ण कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला
रुग्णाच्या मृत्यूच्या काही काळानंतरच त्यांच्या नातेवाईक डॉक्टरांवर रुग्णांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. प्रभागात उपस्थित असलेल्या डॉक्टरांवर त्यांनी हल्ला केला. या घटनेनंतर हल्लेखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र, त्यानंतर कनिष्ठ डॉक्टरांनी रुग्णालयाबाहेर निदर्शने करत तेलंगणा सरकारकडे कोरोना प्रभागात ड्यूटीवर असलेल्या डॉक्टरांच्या संरक्षणासाठी विशेष संरक्षण दल गठित करण्याची मागणी केली.