महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

केवळ 'भारत माता की जय' म्हणणारेच भारतात राहू शकतात; केंद्रीय मंत्र्यांचे वक्तव्य - केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान एनआरसी

भारतात राहत असाल, तर भारत माता की जय म्हणावेच लागेल. जे लोक असे म्हणतील, तेच भारतात राहू शकतील, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केले आहे. पुण्यामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या ५४ व्या महाराष्ट्र प्रदेश अधिवेशनामध्ये ते बोलत होते.

Do we want country to become Dharam Shala, asks Pradhan
केवळ 'भारत माता की जय' म्हणणारेच भारतात राहू शकतात; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य

By

Published : Dec 29, 2019, 10:41 AM IST

पुणे -भारतात राहत असाल, तर भारत माता की जय म्हणावेच लागेल. जे लोक असे म्हणतील, तेच भारतात राहू शकतील, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केले आहे. पुण्यामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या ५४ व्या महाराष्ट्र प्रदेश अधिवेशनामध्ये ते बोलत होते.

' केवळ 'भारत माता की जय' म्हणणारेच भारतात राहू शकतात'

यावेळी बोलताना, राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीला विरोध करणाऱ्या लोकांना त्यांनी लक्ष्य केले. भगत सिंग आणि सुभाषचंद्र बोस यांसारख्या लोकांनी आपल्या प्राणाचे बलिदान देऊन या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. या देशाला हे एनआरसीला विरोध करणारे लोक धर्माशाळा बनवणार आहेत का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. हा देश धर्मशाळा नाही, की कोणीही येऊन इथे भटकू शकेल. त्यामुळे एनआरसीचे हे आव्हान आपल्याला पेलावेच लागेल. तसेच, केवळ त्याच लोकांना इथे राहू दिले जावे, जे की 'भारत माता की जय' म्हणतील, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

हेही वाचा : तिहेरी तलाकच्या पीडितांना मिळणार वार्षिक सहा हजार रूपये पेन्शन

ABOUT THE AUTHOR

...view details