महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

श्रीकृष्ण जन्मभूमीवरील मशीद हटविण्यासंबंधीची याचिका मथुरा न्यायालयाने स्वीकारली

श्रीकृष्ण जन्मभूमी जमीन वादावरील याचिका मथुरा जिल्हा न्यायालयाने स्वीकारली आहे. मुघल सम्राट औरंगजेबाने १७ व्या शतकात हिंदू मंदिराचा काही भाग पाडून त्याजागी मशीद बांधली होती, असा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे. मशीद बेकायदेशीर जागेवर असून मंदिराच्या जागेतील अतिक्रमण काढून टाकण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे.

file pic
श्रीकृष्ण मंदीर

By

Published : Oct 16, 2020, 7:54 PM IST

मथुरा - श्रीकृष्ण जन्मभूमी जमीन वादावरील याचिका मथुरा जिल्हा न्यायालयाने स्वीकारली आहे. २ ऑक्टोबरला मथुरा दिवाणी न्यायालयाने याचिका फेटाळली होती. मात्र, आता जिल्हा न्यायालयाने याचिका स्वीकारली आहे. मथुरेतील श्रीकृष्ण मंदिराजवळील शाही ईदगाह मशीद काढून टाकण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे.

न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी १८ नोव्हेंबरला ठेवली आहे. श्रीकृष्ण जन्मस्थान परिसर सुमारे साडेतेरा एकरचा आहे. यात मंदीर आणि जवळच शाही ईदगाह मशीद आहे. ही मशीद हिंदू मंदिराचा काही भाग पाडून बांधण्यात आल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे. २६ सप्टेंबरला काही भाविकांनी या प्रकरणी मथुरा जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली होती. मुघल सम्राट औरंगजेबाने १७ व्या शतकात हिंदू मंदिराचा काही भाग पाडून त्याजागी मशीद बांधली होती. मशीद बेकायदेशीर जागेवर असून मंदिराच्या जागेतील अतिक्रमण काढून टाकण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे.

१९९१ चा धार्मिक श्रद्धास्थाने कायदा

२ ऑक्टोबरला न्यायालयाने धार्मिक श्रद्धास्थाने कायदा १९९१ चा दाखला देत याचिका स्वीकारण्यास नकार दिला होता. रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद वाद निर्माण झाल्यानंतर केंद्र सरकारने १९९१ ला कायदा पास केला होता. त्यानुसार १५ ऑगस्ट १९४७ साली देशात धार्मिक स्थळांची जी स्थिती होती, तीच कायम राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. धार्मिक स्थळांच्या मालकी हक्कांवरून वाद होऊ नये हा हेतू यामागे होता.

ABOUT THE AUTHOR

...view details