श्री. विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्या वतीने दिपावली लक्ष्मीपुजन निमीत्त आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचा गाभारा या आकर्षक फुलांच्या सजवटीने खूलून दिसत आहे. श्री. विठ्ठल व श्री. रुक्मिणीमातेच्या गाभाऱ्यात व मंदिरात लाल व पिवळ्या जलबेरा फुलाची सुंदर व मनमोहक अशी आरास करण्यात आली आहे.
देशभरात अशा प्रकारे साजरी होत आहे दिवाळी; पाहा एका क्लिकवर.. - दिवाळी उत्सव लाईव्ह
13:04 November 14
विठ्ठल-रुक्मिणी मंदिर फुलांनी सजवले..
13:01 November 14
काळाराम मंदिरात दिवाळी साजरी..
नाशिकच्या ऐतिहासिक श्री काळाराम मंदिरात आज पहाटे प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि माता सीता यांच्या मूर्तींना अभ्यंगस्नान घालण्यात आले. वर्षातील आजचा दिवस अत्यंत महत्वाचा मानला जातो. तिन्ही मूर्तींना सुवासिक तेल उटणे लावून स्नान घालण्यात आले. दरवर्षीप्रमाणे यावर्षी भाविकांना श्री रामांचे दर्शन घेता येणार नसले तरी अनेक वर्षांची परंपरा यावर्षीही साधेपणाने जपण्यात आली आहे.
10:16 November 14
दिल्लीतील साईमंदिरात भाविकांची रांग
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी दिल्लीतील साई मंदिरात भक्तांनी पहाटेपासूनच रांग लावली होती..
09:42 November 14
तामिळनाडूमध्ये फटाक्यांच्या आतिषबाजीत दिवाळी
तामिळनाडूमध्ये फटाके वाजवत लोकांनी दिवाळी साजरी केली..
08:33 November 14
शिवाजी पार्कमध्ये रोषणाई..
दिवाळीच्या मुहूर्तावर मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये मनमोहक रोषणाई करण्यात आली आहे.
08:28 November 14
झंडेवाली मंदिरात रांग..
दिवाळीच्या मुहूर्तावर दर्शनासाठी दिल्लीमधील झंडेवाली मंदिरात भाविकांनी रांग लावली आहे..
08:25 November 14
अयोध्येतील हनुमान मंदिरात गर्दी..
दिवाळीच्या मुहूर्तावर अयोध्येमधील हनुमान गर्ही मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. तसेच अयोध्येमध्ये दीपोत्सवही साजरा केला जात आहे.
08:23 November 14
गोव्यात नरकासुराचे दहन..
गोव्यात नरकासुराच्या पुतळ्याचे दहन करत दिवाळी उत्सवास सुरुवात करण्यात आली.
08:22 November 14
देशभरात अशा प्रकारे साजरी होत आहे दिवाळी; पाहा एका क्लिकवर..
हैदराबाद :देशभरात आज दिवाळी सण उत्साहाने साजरा केला जात आहे. विविध ठिकाणी कशा प्रकारे दिवाळी साजरी केली जात आहे, पाहूयात..