नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील सर्व नागरिकांना रविवारी ९ वाजता आपल्या घरातील लाईट बंद करुन दिवे, मेणबत्ती आणि टॉर्च सुरु करण्याचे आवाहन केले आहे. याच पार्श्वभूमीवर आता उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनीदेखील ट्विट केले आहे. रात्री ९ वाजता ९ मिनीटांसाठी मेणबत्ती पेटवत सर्वांनी कोरोनासोबतची लढाई लढण्याचे आवाहन केले आहे.
'आज दिवा पेटवा; कोरोनाविरुद्धची लढाई १३० कोटी जनता लढणार' - light candle
रात्री ९ वाजता ९ मिनीटांसाठी मेणबत्ती पेटवत सर्वांनी कोरोनासोबतची लढाई लढण्याचे आवाहन केले आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सामाजिक अंतर आणि वैयक्तिक स्वच्छता पाळणे गरजेचे आहे. यासोबतच अधिकारी तसेच आरोग्य तज्ञांनी दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन ट्विटच्या माध्यमातून नायडूंनी नागरिकांना केले.
ट्विटच्या माध्यमातून नायडू म्हणाले, कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सामाजिक अंतर आणि वैयक्तिक स्वच्छता पाळणे गरजेचे आहे. यासोबतच अधिकारी तसेच आरोग्य तज्ञांनी दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहनही त्यांनी नागरिकांना केले.
कोरोनाच्या या लढाईत समोर येणाऱ्या आव्हांनाने निराश होऊ नका. आपण आशेचा प्रकाश, ज्ञानाची ज्योत आणि एकत्र मिळून काम करत अंधकाराला दूर करु. यासाठीच आज रात्री ९ वाजता कोरोनासोबतच्या लढ्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे त्यांनी आवाहन केले. हे करुन कोरोनाविरुद्धच्या लढाईत भारताची १३० कोटी जनता एकत्र लढत असल्याचे दाखवून देऊ, असे त्यांनी म्हटले. यासोबतच सर्वांच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि समृद्धीसाठी प्रार्थना करण्याचा सल्लाही त्यांनी दिला.