जयपूर -सवाई माधोपूर जिल्ह्यातील रणथंभोर संरक्षित व्याघ्र प्रकल्पातील वाघांच्या संख्येवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. एका अहवालानुसार पार्कमधील 26 वाघ गायब असल्याचे सांगण्यात येत आहे. हा अहवाल समोर आल्यानंतर राष्ट्रीय वाघ संरक्षण प्राधिकरणाच्या सदस्य आणि राजसमंद येथील भाजप खासदार दीया कुमारी यांनी केंद्र सरकारला पत्र लिहून यावर चिंता व्यक्त केली होती. या विषयावर त्यांनी पत्रकार परिषदही घेतली आहे.
शनिवारी दीया कुमारी यांनी पत्रकारांशी संवाद साधताना वाघांची संख्या घटण्याविषयी चिंता व्यक्त केली. 'या वन्यजीव अभयारण्यातील वाघांचे आणि इतर प्राण्यांचे संरक्षण करणे आवश्यक आहे,' असे त्या म्हणाल्या. त्यांनी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना लिहिलेल्या पत्रात या अहवालाचा उल्लेख केला आहे. तसेच, या प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे. अशा घटना पुन्हा घडू नयेत, म्हणून शिकाऱ्यांना अटक करून त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
हेही वाचा - नमस्ते ट्रम्प : जगातील सर्वांत मोठ्या मोटेरा स्टेडियममध्ये जमणार 1.25 लाख लोक, ही आहे खासियत