महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'#BanRss' या हॅशटॅगशी आपण सहमत नाही- सिंघवी - #BanRss

सिंघवी म्हणाले की, देशाच्या आर्थिक समस्येबाबत आपल्याला अत्यंतिक डाव्या आणि अत्यंतिक उजव्या अशा दोन्ही विचारसरणींची गरज आहे. मात्र, यामुळे वाद होण्याची शक्यता आहे, कारण काँग्रेस दोन्ही अंत्यंतिक विचारसरणींचा विरोध करते. त्याचबरोबर, भारताला हिंदू आणि गैर हिंदूंचे विचार देखील आवश्यक आहे. त्यामुळे, आरएसएसवर बॅन आणता येणार नाही.

Abhishek Manu Singhvi
अभिषेक मणू सिंघवी

By

Published : May 4, 2020, 10:52 AM IST

नवी दिल्ली- '#BanRss' या ट्विटर हॅशटॅगशी आपण सहमत नाही, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी दिली आहे. जरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बहुतांश विचारांशी माझे मतभेद असले, तरी '#BanRss' शी आपण सहमत नाही. भारताला भिन्न विचारांची गरज आहे, अशी प्रतिक्रिया सिंघवी यांनी दिली आहे.

सिंघवी म्हणाले की, देशाच्या आर्थिक समस्येबाबत आपल्याला अत्यंतिक डाव्या आणि अत्यंतिक उजव्या अशा दोन्ही विचारसरणींची गरज आहे. मात्र, यामुळे वाद होण्याची शक्यता आहे, कारण काँग्रेस दोन्ही अंत्यंतिक विचारसरणीचा विरोध करते. त्याचबरोबर, भारताला हिंदू आणि गैर हिंदूंचे विचार देखील आवश्यक आहे. त्यामुळे, आरएसएसवर बॅन आणता येणार नाही. तसेच, आपल्याला खरोखरच अनेकवचणी बनवण्यासाठी भारतात सर्वच स्तरातील लोकांची उपस्थिती असणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया सिंघवी यांनी '#BanRSS' या ट्विटर हॅशटॅगबाबत दिली आहे.

हेही वाचा-लॉकडाऊन ३.० : देशातील विविध भागांमध्ये दारु विक्री सुरू; दुकानांबाहेर पहाटेपासूनच लागल्या रांगा..

ABOUT THE AUTHOR

...view details