लखनौ -समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांनतर त्यांनी शक्तीप्रदर्शन केले. यावेळी सपा आणि बसपचे अनेक नेते उपस्थित होते. डिंपल यादव या कन्नौज मतदार संघातून निवडणूक लढत आहेत.
उत्तर प्रदेश येथे बहुजन समाज पक्ष आणि समाजवादी पक्षाने आघाडी केली आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आहे. डिंपल यादव यांच्या शक्तीप्रदर्शनामध्ये प्रचंड गर्दी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. तर, कोणत्याही प्रकारच्या आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही, यावर निवडणूक आयोगाची नजर असणार आहे.
शक्ती प्रदर्शनासाठी बसप नेते सतीश मिश्रा आणि राज्यसभा सदस्य संजय सेठही उपस्थित आहेत. अखिलेश यादव, डिंपल यादव आणि जया बच्चन पक्षाच्या केंद्रीय कार्यालयातून रोड-शोला सुरुवात झाली. त्यानंतर ही रॅली शहरातील विविध ठिकाणाहून जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाली. अर्ज दाखल केल्यांनतर ही रॅली आशा हॉटेल लॉन येथे येईल. त्यानंतर पक्षनेते जनतेला संबोधित करणार आहेत.
कनौज येथे चौथ्या टप्प्यामध्ये २९ तारखेला मतदान होणार आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज ९ तारखेपर्यंत दाखल करणे आवश्यक आहे. डिंपल यादव यांच्या शक्ती प्रदर्शनासाठी पोलिसांनी चोख सुरक्षा व्यवस्था केली आहे. संपूर्ण रॅलीची व्हिडिओग्राफी होणार आहे. आचारसंहितेचे कोणत्याही प्रकारे उल्लंघन झाल्यास पक्षावर कारवाई होऊ शकते.