नवी दिल्ली - आज या भारतात महात्मा गांधी यांचा खून करणाऱया विचारसरणीचा विजय झाला आहे. तर गांधी यांच्या विचारसरणीचा पराभव झाला, याची मला चिंता वाटत असल्याचे वक्तव्य दिग्विजय सिंह यांनी केले.
हा विजय महात्मा गांधींचा खून करणाऱया विचारसरणीचा - दिग्विजय सिंह
जेष्ठ काँग्रेस नेते दिग्विजय सिंह हे भोपाळ येथून लोकसभा निवडणूक लढवत होते. या निवडणुकीत प्रज्ञासिंह ठाकूर यांनी दिग्विजय सिंह यांचा पराभव केला. तसेच देशात भाजप व मित्र पक्षांना बहुमत मिळाले. यावर दिग्विजय सिंह यांनी चिंता व्यक्त केली.

लोकसभा निवडणूकीत प्रचारा दरम्यान प्रज्ञासिंह ठाकूर यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. महात्मा गांधी यांचा खून करणारा नथूराम गोडसे हे देशभक्त असल्याचे त्या म्हणाल्या होत्या. त्यांच्या या वक्तव्यावरुन खूप गदारोळ झाला होता. भाजपने प्रज्ञासिंह ठाकूर यांना माफी मागण्यास सांगितले होते. प्रज्ञासिंह यांनी पक्षाच्या सांगण्यावरुन माफीही मागितली होती.