महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

काँग्रेस, आघाडी पक्षांनी बेगुसरायमध्ये उमेदवार देऊन चुकी केली - दिग्विजय सिंह - Lok sabha election

मध्यप्रदेशच्या भोपाळ मतदार संघातून काँग्रेसचे दिग्विजय सिंह निवडणूक लढत आहेत. त्यांच्या विरोधात भाजपच्या प्रज्ञा ठाकूर रिंगणात आहेत. रविवारी अचानक सिंह भोपाळच्या कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयात पोहोचले. तेथे चक्क त्यांनी आपल्या पक्षाच्याच नीतींवर आक्षेप घेतला.

दिग्विजय सिंह

By

Published : Apr 28, 2019, 6:55 PM IST

Updated : Apr 28, 2019, 11:52 PM IST

भोपाळ - मध्य प्रदेशच्या भोपाळ मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार आणि माजी मुख्यमंत्र दिग्विजय सिंहांनी चकीत करणारे विधान केले आहे. आपण कन्हैया कुमारचे समर्थक आहोत. बेगुसराय लोकसभा मतदार संघातून काँग्रेस आणि आघाडी पक्षांनी त्यांच्या विरोधात उमेदवार देऊन चुकी केली, असे म्हणून त्यांनी आघाडीला गोंधळात टाकले आहे. तसेच कन्हैया कुमार त्यांच्या प्रचारासाठी येतील, असेही त्यांनी सांगितले.

मध्यप्रदेशच्या भोपाळ मतदार संघातून काँग्रेसचे दिग्विजय सिंह निवडणूक लढत आहेत. त्यांच्या विरोधात भाजपच्या प्रज्ञा ठाकूर रिंगणात आहेत. रविवारी अचानक सिंह भोपाळच्या कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयात पोहोचले. तेथे चक्क त्यांनी आपल्या पक्षाच्याच नीतींवर आक्षेप घेतला आहे.

बिहारमध्ये काँग्रेसने आरजेडी आणि इतर स्थानिक पक्षांशी आघाडी केली आहे. बेगुसराय येथून त्यांनी डॉ. तनवीर हसन यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, या मतदार संघातून कम्युनिस्ट पक्षाच्या तिकिटावर कन्हैया कुमारही निवडणूकल लढत आहेत. काँग्रेस आणि आघाडी पक्षांनी तेथून उमेदवारच देऊन चुक केली, असे चकित करणारे विधान त्यांनी यावेळी केले.

यासंदर्भात आपण पक्षाची समजूतही काढली होती. मात्र, त्याचा काहीच परिणाम झाला नाही, असेही सिंहानी स्पष्ट केले. तसचे कन्हैया कुमार त्यांचा प्रचार करण्यासाठी भोपाळमध्ये येत आहेत. याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

Last Updated : Apr 28, 2019, 11:52 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details