जयपूर- एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी हे भाजपसाठीच काम करतात, अशी टीका काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी केली आहे.
ओवैसी भाजपसाठी काम करतात, एमआयएमला निवडणुकीसाठी भाजप पैसे पुरवते - bjp in jodhpur
मुस्लीम मत विभाजनासाठी भाजप एमआयएम पक्षाला निवडणुकीसाठी पैसे पुरविते, अशी टीका काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी केली आहे.
काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजय सिंह
जोधपूर (राजस्थान) येथे ते माध्यमांशी संवाद साधताना बोलत होते. ते पुढे म्हणाले, खासदार ओवैसी हे प्रक्षोभक भाषणे देत असतात याचा फायदा केवळ भाजपलाच होत आहे. भाजप एआयएमआयएमला निवडणूक लढविण्यासाठई पैसे पुरवत असते. कारण, एमआयएममुळे मुस्लीम मतांचे विभाजन होऊन याचे संपूर्ण फायदा भाजपलाच होत आहे.
हेही वाचा -जयपूरमध्ये सिलिंडरचा भीषण स्फोट; दोघांचा मृत्यू, एक गंभीर