नवी दिल्ली- तेलविक्री करणाऱ्या कंपन्यांनी शनिवारी डिझेलच्या दरात 15 पैसे प्रति लिटर वाढ केली आहे. सोमवारनंतर शनिवारपर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या किमती स्थिर होत्या. डिझेलच्या दरात सोमवारी 12 पैसे दरवाढ झाली होती.
नवी दिल्लीत डिझेलची किंमत 81.79 रुपये प्रति लिटर झाली. पेट्रोलचा दर प्रति लिटर 80.43 रुपयांवर स्थिर आहे. वाहतूक क्षेत्रात मागणी कमी असून डिझेलच्या किमती वाढणे, अनपेक्षित असे आहे. राजधानी दिल्लीत दोन्ही इंधन तेलांच्या किमतीतील फरक वाढला आहे.