नवी दिल्ली -राजधानी दिल्लीत डिझेलच्या किमतीत उच्चांकी वाढ झाली आहे. मंगळवारी डिझेलच्या दरात प्रति लिटर 25 पैशांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील डिझेलचा दर 80 रुपये 78 पैसे झाला आहे. आत्तापर्यंतचा डिझेलचा हा सर्वात जास्त दर आहे. सरकारी इंधन विक्री कंपनीने यासंबंधी पत्रक जारी केले आहे.
मागील काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत सतत वाढ करण्यात येत आहे. कोरोना संकट असताना देशभरातून दरवाढीला विरोधही होत आहे. काँग्रेसकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. त्यानंतर आठ दिवस किमतीत वाढ करण्यात आली नाही. मात्र, आता पुन्हा 25 पैशांनी डिझेलचे दर वाढविण्यात आले. प्रत्येक राज्यातील मुल्यावर्धीत करानुसार पेट्रोल डिझेलच्या किंमती बदलतात.